आता हा देश गांधींचा राहणार नाही, नवीन राष्ट्रपिता तयार होतोय; तुषार गांधींचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याच्या देशात होत असलेल्या उदात्तीकरणाबाबत तुषार गांधी यांनी खंत व्यक्त केली आहे. तुषार गांधी हे महात्मा गांधींचे पणतू आहेत. ‘थोडीच वर्षे शिल्लक राहिली आहेत. आता हा देश गांधींचा राहणार नाही. महात्मा गांधी यांची शिकवण संपुष्टात येते आहे आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेची विचारधारा प्रबळ होते आहे.’ अशा शब्दात त्यांनी त्यांच्या मनातली खंत व्यक्त केली आहे. देशात आता नवा राष्ट्रपिता तयार होत असून त्याचं नाव नथुराम गोडसे असेल असंही असंही तुषार गांधी यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

30 जानेवारीला महात्मा गांधी यांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्त जालना येथील जेईएस महाविद्यालयात तुषार गांधी यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी तुषार गांधी यांनी आता देशात नवे राष्ट्रपिता तयार होत असून त्यांचं नाव नथुराम गोडसे आहे असंही म्हटलं आहे.

महात्मा गांधी हिंदू होते आणि गोडसे हिंदुत्ववादी; राहुल गांधींचं भाजप-संघावर टीकास्त्र

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाले तुषार गांधी?

‘देशातल्या स्थितीत सध्या प्रचंड विषमता आहे. गांधी विचाराचं द्वेष करणाऱ्या मानसिकतेचा खुलेआम प्रसार होतो आहे. त्यामुळे गांधी विचारांचा द्वेष करणारे हळूहळू आपल्या पायाखालची जमीन ओढून घेत आहेत. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना आणि आझादी का अमृतमहोत्सव साजरा होत असतानाच देशात द्वेषाचं विष पसरलं आहे. भारताच्या गौरवशाली आणि समृद्धशाली इतिहासाचे स्मरण करण्यासाठी सरकारकडून हा उत्सव साजरा होतो आहे. मात्र अमृत महोत्सवाचे अमृत हे द्वेषाचे विष झाले आहे.’ असंही तुषार गांधी यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

काही लोक इतिहासाशी छेडछाड करत असून तो आपल्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपल्याला खऱ्या इतिहासाला पुन्हा समोर आणावे लागेल. खरा इतिहास आपल्याला पुनरुज्जीवित करायचा असून समाजातील द्वेष आणि विभाजनाविरुद्ध आवाज उठवायचा आहे, असे तुषार गांधी या कार्यक्रमात म्हणाले. आपण हिंसाचार, द्वेष आणि विभाजनाची संस्कृती स्वीकारली आहे. धर्म, जात, प्रदेश या आधारावर आपण विभागलो आहोत, असेही तुषार गांधी म्हणाले.

ADVERTISEMENT

देश ही एक भूमी आहे, ज्यावर सर्व लोक राहतात अन् लोकच देश घडवतात. जेव्हा महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा काढण्याचा प्रस्ताव दिला होता, तेव्हा काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी या विचारधारेचा विरोध केला होता. त्यांना ही योजना यशस्वी होईल का, यावर त्यांच्या मनात शंका होती. यामुळे पक्षाचं नुकसान होईल, असेही त्या नेत्यांना वाटत होतं, असे तुषार गांधी म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT