राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीची छाप; बार्डो आणि आनंदी गोपाळने मारली मजल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मराठीतील चित्रपटांनी तसंच कलाकरांनी त्यांची छाप पाडली आहे. बेस्ट प्रोडक्शन डिझाईन तसंच सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून आनंदी गोपाळ सिनेमाला पुरस्कार जाहीर झाला आहे.

ADVERTISEMENT

मराठमोळे अशोक राणे यांच्या ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अशोक राणे यांचं हे एक आत्मकथनात्मक पुस्तक आहे. अशोक राणेंना तिसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पहिला पुरस्कार ‘चित्तरकथा’ या पुस्तकासाठी 1996 रोजी तर दुसरा 2003 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक म्हणून पुरस्कार मिळाला होता.

हे वाचलं का?

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून ‘बार्डो’ची निवड करण्यात आलीये. तर ‘जक्कल’ या मराठी सिनेमाला बेस्ट इन्व्हेस्टिगेटीव्ह फिल्म हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नॉन फिचर फिल्म बेस्ट दिग्दर्शक डेब्यू म्हणून राज प्रितम मोरे यांना ‘खिसा’ सिनेमासाठी पुरस्कार जाहीर झालाय.

ADVERTISEMENT

राष्ट्रीय एकात्मतावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘ताजमहाल’ याला पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार सावनी रविंद्र हिला बार्डोमधील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी मिळाला आहे. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी यांना ताशकंत फाईल्स या सिनेमासाठी मिळाला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT