Pune Suicide : नॅशनल हॉर्स रायडर तरूणीची अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यातील नांदेड सिटी परिसरात राहणाऱ्या नॅशनल हॉर्स रायडर तरूणीने अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. श्रिया गणेश पुरंदरे (वय 17) असं या अल्पवयीन तरूणीचं नाव आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड सिटी येथील मधुवंती डी 103 मध्ये 17 वर्षीय श्रिया गुणेश पुरंदरे ही तरुणी नॅशनल हॉर्स रायडर होती. सध्या तिचे बारावीचे शिक्षण सुरू होते. तर ती नेहमी प्रमाणे सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गॅलरीत गेली असताना. त्याच वेळी तेथील अभिजीत देशमुख यांना खाली काही तरी पडल्याचा जोरात आवाज आला. अभिजीत यांनी खाली पाहिले असता. श्रिया असल्याचे दिसून आले. त्यानंतर तिला तातडीने रूग्णालयात दाखल केले असता. तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. श्रियाच्या आत्महत्येचं कारण अद्याप पर्यंत समजू शकले नसल्याचे हवेली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT