नवी मुंबई : वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेकडून नवे निर्बंध

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील मॉल, डिपार्टमेंटल स्टोअर, बाजार, उद्यानांसाठी नवे नियम जाहीर केले आहेत. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यासंदर्भातले आदेश जाहीर करत नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय.

ADVERTISEMENT

मिशन बिगीन अगेन कार्यक्रमाअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या नवीन नियमांनुसार आता प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी चार वाजल्यापासून शनिवार आणि रविवारचा पूर्ण वेळ मॉलमध्ये प्रवेश देताना नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. कोविड चाचणीचा अहवाल निगेटीव्ह असणाऱ्या लोकांनाच मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. विकएंडला मॉलमध्ये येणाऱ्या नागरिकांनी ७२ तास आधी आपल्या RTPCR टेस्टचा रिपोर्ट सोबत बाळगणं गरजेचं आहे.

हे वाचलं का?

नागरिकांप्रमाणे दुकानदार आणि मॉल प्रशासनासाठीही महापालिकेने नवीन नियम आखून दिले आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न करता मॉलमध्ये गर्दी झाल्याचं आढळल्यास प्रत्येक वेळी मॉल व्यवस्थापनाकडून ५० हजारांचा आर्थिंक दंड आकारण्यात येणार आहे. दोनवेळा आर्थिक दंड आकारल्यानंतरही तिसऱ्या वेळी नियमांचं उल्लंघन झाल्याचं लक्षात आलं तर संपूर्ण मॉल बंद करण्यात येईल असंही महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

याव्यतिरीक्त शहरातील डी-मार्ट, रिलायन्स फ्रेश, स्टार बाजार यासारख्या दुकानांमध्ये एका वेळी किती लोकं उभी राहू शकतात याचं प्लानिंग करुन टोकन सिस्टीम तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागा, ओपन जिम बंद राहणार आहेत. १० मार्चपासून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी या उपाययोजना केल्या आहेत.

ADVERTISEMENT

मुंबईत Corona चा कहर, दिवसभरात ५ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT