नवज्योत सिद्धू यांनी प्रदेशाध्यपदाचा राजीनामा का दिला?; ‘ही’ आहेत 6 कारणं
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाब काँग्रेसची सूत्रं हाती आलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. सिद्धू यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यांच्या राजीनाम्याची काही कारणंही समोर आली असून, यात सहा प्रमुख कारणं आहेत. नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाबचं मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यामुळेच त्यांनी सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या नावाला विरोध केला. […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाब काँग्रेसची सूत्रं हाती आलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.
हे वाचलं का?
सिद्धू यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यांच्या राजीनाम्याची काही कारणंही समोर आली असून, यात सहा प्रमुख कारणं आहेत.
ADVERTISEMENT
नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाबचं मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यामुळेच त्यांनी सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या नावाला विरोध केला.
ADVERTISEMENT
रंधावा यांच्या सिद्धूंचा विरोध होता, तर सिद्ध यांच्या नावाला कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या गटाचा. त्यामुळे त्यांनी चरणजित सिंग चन्नी यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सूचवलं होतं.
नवे मुख्यमंत्री चन्नी सिद्ध यांच्यापासून सावध तर होतेच, पण त्यांच्यावर विश्वासही टाकत नव्हते. हे अमृतसरमधील एका प्रसंगावेळी दिसून आलं होतं.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी अमृतसर ट्रस्टच्या प्रमुखांना नियुक्तीपत्र देण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमत्री चन्नी यांनी ते पत्र त्यांच्याकडून हिसकावून घेतलं होतं.
मुख्यमंत्री कार्यालयात आपल्या मर्जीतले अधिकारी असावेत, अशी नवज्योत सिंग सिद्धूची इच्छा होती. पण, चन्नी यांनी सिद्ध यांचा रबर स्टॅम्प बनण्यास नकार दिला.
मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्य सचिव, सचिव, पोलीस महासंचालक आदींची निवड मुख्यमंत्री चन्नी यांनीच केली.
हे सगळं होत नाही, तोच नवज्योतसिंग सिद्धू यांनी खातेवाटपाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. कारण रंधावा यांना गृहमंत्री बनवू नये, अशी सिद्धूंची इच्छा होती.
नेहमीप्रमाणेच मुख्यमंत्री चन्नी यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या महत्त्वकांक्षावर पाणी फेरलं. या सगळ्या घटनाक्रमामुळे नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT