ज्या अभिनेत्रींना बोलावलं गेलं त्यांना अटक झाली नाही, मालदिव दौऱ्याच्या खोलात जा -नवाब मलिक
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईवर पुन्हा सवाल उपस्थित केले आहे. इतकंच नाही तर गेल्या वर्षभरात बॉलिवूडमधील वेगवेगळ्या अभिनेत्रींना एनसीबीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्याबद्दल शंका उपस्थित करत मालदिवमध्ये काय झालं? याकडे अधिक बघायला हवं, असा मुद्दा मलिकांनी उपस्थित केला आहे. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत […]
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईवर पुन्हा सवाल उपस्थित केले आहे. इतकंच नाही तर गेल्या वर्षभरात बॉलिवूडमधील वेगवेगळ्या अभिनेत्रींना एनसीबीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्याबद्दल शंका उपस्थित करत मालदिवमध्ये काय झालं? याकडे अधिक बघायला हवं, असा मुद्दा मलिकांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत दिल्लीहून येणाऱ्या एनसीबीच्या टीमकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. मलिक म्हणाले, ‘एनसीबीच्या अधिकाऱ्याचं पत्र मिळालं होतं. ते एनसीबीकडे पाठवलं आहे. दखल घेऊ असं म्हणाले होते, मात्र नियमावर बोट ठेवत त्याची दखल घेतली जाऊ शकत नाही, असं सांगण्यात आलं. त्या पत्रात उल्लेख केलेल्या बाबी बघितल्या तर पूर्ण संस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात.’
‘प्रभाकर साईलने पुराव्यासह म्हणणं मांडलं आहे. व्हिजिलन्स समितीने समीर वानखेडे, के.पी. गोसावी, प्रभाकर साईल आणि समीर वानखेडे यांचा चालक माने यांचा सीडीआर काढावा. पन्नास लाखांची रक्कम उचलण्यात ज्या गाडीचा वापर झाला आहे. गोसावीच्या घरी पैसे पोहोचवण्यात आले. पुन्हा गाडी परत गेली. नंतर सॅम डिसोजाला पैसे देण्यात आले. आम्हाला वाटतं ईलेक्ट्रॉनिक चौकशी झाली, तर सगळ्या गोष्टी समोर येतील.’
हे वाचलं का?
NCB चं पाच सदस्यीय पथक दिल्लीहून मुंबईला येणार, समीर वानखेडेंवरच्या आरोपांची चौकशी होणार?
‘एक गुन्हा दाखल होऊन वर्ष लोटून गेलं आहे. त्या प्रकरणात एकालाही अटक झालेली नाही. पण, त्या गुन्ह्यात दीपिका पदुकोणला बोलावलं गेलं. चॅटच्या आधारावर बोलावलं गेलं होतं, पण अटक झाली नाही. सारा अली खानला बोलावलं गेलं, अटक झाली नाही. श्रद्धा कपूरला बोलावलं गेलं, पण अटक केली गेली नाही. जर हे खोटं आहे, तर त्यावेळच्या माध्यमांचं वार्तांकन बघावं. जेव्हा जेव्हा कुणी अभिनेता-अभिनेत्री यायची पूर्ण देशातील माध्यमांचं लक्ष्य होतं. ज्या सर्वांना बोलावलं गेलं, त्यांना अटक झाली नाही. त्याच्या खोलात जावं. मी हे सुद्धा सांगतोय की मालदिवच्या दौऱ्याकडे बघा. त्यावेळी कोणता अभिनेता-अभिनेत्री मालदिवमध्ये होते? म्हणजे सर्व प्रकार समोर येईल’, असं मलिक म्हणाले.
ADVERTISEMENT
समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचा पुन्हा ‘ट्वीट’वार; ‘निकाहनामा’ची दिली माहिती
ADVERTISEMENT
‘सॅम डिझोजा हा समीर वानखेडेंचा मित्र आहे. त्या क्रूझवर नाचणारा दाढीवाला कोण होता? हे सर्व समीर वानखेडेंनी सांगावं. मला कुणाच्याही जातीबद्दल बोलायचं नाही. पण बोगसगिरी करून सरकारी नोकरी मिळवली गेली. हेच मला सांगायचं आहे’, असंही मलिक म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT