मुंबईत घर द्या, शिवसेना आमदाराची मागणी ! मतदारसंघात राष्ट्रवादीने केलं भीक मांगो आंदोलन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यातील आमदारांना मुंबईत घरं देण्याचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. औरंगाबादच्या कन्नड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनीही काही दिवसांपूर्वी मुंबईत घर देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीचा कन्नड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलाच समाचार घेतला आहे. राष्ट्रवादीने आमदार राजपूत यांच्या घरासाठी मतदारसंघात आज भीक मांगो आंदोलन केलं. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या या आंदोलनात भिकारीही सहभागी झाले होते.

ADVERTISEMENT

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आमदार राजपूत यांच्यावर घणाघाती टीका केली. “आमदारकीच्या मागील अडीच वर्षात तालुक्यात गोरगरीब आणि गरजू जनतेचे घरकुलासाठी प्रधानमंत्री आवास योजनेत ४१ हजार प्रस्ताव दाखल आहेत. अडीच वर्षात फक्त १ हजार १२१ घरकुलांना मान्यता मिळाली. त्यातही पुर्ण अनुदान फक्त ३६७ घरकुलांनाच मिळाले आहे. गोरगरीब गरजूंच्या घरकुलाच्या प्रश्न असताना आमदार उदयसिंग राजपुत यांनी विधानसभेत यावर कधीही आवाज उठवला नाही किंवा साधा प्रश्नही मांडला नाही. या उलट गोरगरीबांच्या घरकुलाचे काय ते नंतर पहा पण मला मुंबईत घरकुल द्या, अशी केवीलवाणी मागणी राजपूत यांनी विधानसभेत केली.” ज्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने आज निषेध केला.

कन्नड तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेपासून अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित असताना आमदार राजपूत या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत स्वतःच्या घरासाठी मागणी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं.

हे वाचलं का?

आज बाळासाहेब असते, तर ‘तोच’ सल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला असता -भाजप

दुसरीकडे कन्नड विधानसभेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही शिवसेना आमदार राजपूत यांच्या मागणीविरुद्ध भीकमागो आंदोलन करत राज्य सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला.

ADVERTISEMENT

‘आम्ही एकच दणका दिला, तर आईचं दूध आठवेल’; शिवसेना नेत्याची राष्ट्रवादीवर आगपाखड

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT