भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना नोटीस, साक्ष नोंदवण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना नोटीस धाडण्यात आली आहे. 1 जानेवारी 2018 ला जो हिंसाचार घडला त्याप्रकरणी साक्ष नोंदवण्यासंदर्भात त्यांना बोलवण्यात आलं आहे. 23 आणि 24 फेब्रुवारीला साक्ष नोंदवण्यासंदर्भात भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने साक्ष नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. 31 डिसेंबर 2017 च्या दिवशी जी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती त्याबद्दलही शरद पवारांना साक्ष नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

1 जानेवारी 2018 या दिवशी पुण्याजवळ असलेल्या भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमला. या चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल हे आहेत. शरद पवार यांनी भीमा कोरेगाव येथील हिंसाचार हा संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या प्रकरणात अॅड. प्रदीप गावडे यांनी या प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता चौकशी आयोगाने शरद पवारांची साक्ष नोंदवण्यासाठी त्यांना बोलावलं आहे.

हे वाचलं का?

भीमा कोरेगाव प्रकरण : माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची चौकशी आयोगासमोर 6 तास साक्ष

या हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी नऊ कार्यकर्त्यांना अटक केली होती. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी केली होती. हिंसाचार झाला तेव्हा राज्यात भाजपाप्रणित सरकार सत्तेत होते आणि तेव्हा हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधी पक्षांनी केला होता.

ADVERTISEMENT

भीमा कोरेगावच्या लढाईच्या स्मरणार्थ एल्गार परिषदेच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2018 रोजी गावात हिंसाचार झाला होता. काही संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये तोडफोड आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. नंतर जून आणि ऑगस्ट 2018 मध्ये, सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन, अरुण फेरेरा, वेर्नान गोन्साल्विस, सुधा भारद्वाज आणि वरवरा राव या नऊ कार्यकर्त्यांना हिंसाचारात अटक करण्यात आली. यातल्या सुधा भारद्वाज यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

1 जानेवारी 2018 ला काय घडलं होतं?

1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी दलित समाजाचे लोक जमले असताना या कार्यक्रमाला गालबोट लागलं आणि काही हिंसक घटना घडल्या. या घटनांची सुरुवात पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा, पाबळ आणि शिक्रापूर इथून झाली. या गावांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT