वारसांना संधी मिळाली पण त्यांच्याकडून ते झालं नाही – धनंजय मुंडेंचा नाव न घेता पंकजांना टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महाराष्ट्रात उसतोड कामगारांसाठी कल्याण मंडळाची घोषणा करण्यात आली होती. रविवारी या मंडळाच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. पुणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन हजेरी लावली. याव्यतिरीक्त उप-मुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलत असताना धनंजय मुंडे यांनी नाव न घेता आपली बहिण पंकजा मुंडे यांना टोला लगावला.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ मुख्य कार्यालयाचे उदघाटन आज झालाय, याबद्दल मला खूप आनंद होत आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी संपूर्ण आयुष्य या ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी काम केले आहे. त्यांना देखील वाटत होते की, एखादे महामंडळ असावे…पण त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये झाले नाही. तसेच त्यांच्या वारसदारांनाही संधी मिळाली. परंतू त्यांच्याकडून देखील हे काम झालं नाही अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, “माझ्या जीवनातील आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार मंडळाची स्थापना नाही तर त्यांच्या मुख्य कार्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले आहे. महाविकास आघाडीचं सरकार आलं, सरकार मध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी साहेबांनी, दादांनी दिली. या विभागाची जबाबदारी घेत असताना दादांना एक विनंती केली होती की, उसतोड कामगार मंडळ म्हटलं की ते कामगार विभागाकडे जाईल. त्यामुळे मला उस कामगारकरिता खूप काही करायचे आहे”, असं म्हणत ही जबाबदारी मी माझ्याकडे घेतली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्य सरकारने आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात ऊसतोड मजुराच्या मंडळाची घोषणा तर केलीच, भविष्यात कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचणी येऊ नये यासाठी राज्यात गाळप होणार्‍या प्रत्येक टनामागे 10 रुपये ऊस तोड कामगाराच्या कल्याणासाठी ऊस कारखाना दराने ठेवावे आणि राज्य सरकार मार्फत देखील 10 रुपये ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं मुंडे म्हणाले. यामुळे भविष्यात कधी ही या मंडळा ला पैशाची कमी पडणार नाही. या मंडळा मार्फत राज्यातील ऊस तोड कामगारांच्या कुटुंबीयांची विशेष काळजी घेतली जाणार असून त्यांच्या मुलांच्या पदवीपर्यंत शिक्षण कसे होईल हे पाहिले जाणार असल्याचे मुंडे यांनीसांगितलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT