”प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय”; ‘त्या’ फोटोवरुन रोहित पवारांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये गेले होते. या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये सर्व राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. त्यावेळी काढलेला एक फोटो सध्या सोशियल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होत आहे. त्याफोटोमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवटच्या रांगेत उभे असलेले दिसत आहेत. देशात जे राज्य सर्वाधित GST देते त्या राज्याचे मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत उभे कसे असा प्रश्न विचारला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हा फोटो ट्विट करत एकनाथ शिंदेंवरती टीका केली आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

”एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात”. असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रोहित पवारांच्या ट्विटला उदय सामंच यांचं उत्तर

राजकारणासाठी राजकारण करण्यात काहीच अर्थ नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून दिल्लीत महाराष्ट्र मानसन्मान वाढलेला आहे. ज्यावेळी राष्ट्रपती यांचा शपथविधी झाला. त्यावेळी एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पहिल्या रांगेत होते हे विसरून चालणार नाही. अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी रोहित पवार यांच्या ट्विटवर दिली आहे.

फ्रेंडशिप-डे च्या प्रश्नावरती काय म्हणाले एकनाथ शिंदे?

आज फ्रेंडशिप-डे आहे आणि तुमचे सर्व आमदार असं म्हणत आहेत की लवकरच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी मैत्री होणार आहे. तुम्ही उद्धव ठाकरे यांना फ्रेंडशिप-डेच्या शुभेच्छा देणार का? या प्रश्नावर एकनाथ शिंदे गप्प राहिले. ते म्हणाले “फक्त फ्रेंडशीप डे सर्वांसाठी असतो, माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत”, असं म्हणून शिंदे यांनी वेळ मारून नेली.

ADVERTISEMENT

निती आयोगाच्या बैठकीत प्रामुख्याने कशावर झाली चर्चा?

* सिंचन क्षेत्रावर भर राहणार आहे.

ADVERTISEMENT

* सेंद्रीय शेतीकडे लक्ष देणार आहे.

* डाळ उत्पादनात आत्मनिर्भर होण्याकडे कल.

* बागायती क्षेत्रात वाढ होणार.

* जलयुक्त शिवार अभियान राबवणार.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT