मला अर्धांगवायूचा झटका आलेला नाही – Amol Matkari यांचं स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका आल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या. रविवारी अकोल्यात राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात गाणं म्हणत असताना अमोल मिटकरी यांची तब्येत बिघडली होती. परंतू आपल्याला अर्धांगवायूचा झटका आलेला नसून माझी तब्येत बरी असल्याचं मिटकरी यांनी सांगितलं आहे. “काल सकाळपासून माझ्या तब्येतीविषयी सुरु असलेल्या बातम्यांवर चर्चा सुरु आहे. आपल्या सर्वांच्या […]
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका आल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या. रविवारी अकोल्यात राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात गाणं म्हणत असताना अमोल मिटकरी यांची तब्येत बिघडली होती. परंतू आपल्याला अर्धांगवायूचा झटका आलेला नसून माझी तब्येत बरी असल्याचं मिटकरी यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
“काल सकाळपासून माझ्या तब्येतीविषयी सुरु असलेल्या बातम्यांवर चर्चा सुरु आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे मी एकदम ठणठणीत असून सोशल मीडियामधून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही. माझी प्रकृती उत्तम असून सध्या अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. लवकरच जनसेवेत रुजू होईन” असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं.
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादामुळे मी एकदम ठणठणीत असून सोशल मीडियामधून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही. माझी प्रकृती उत्तम असून सध्या अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.लवकरच जनसेवेत रुजू होईल.@NCPspeaks pic.twitter.com/Pscr6jr7K2
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 12, 2021
नेमकं काय घडलं होतं?
हे वाचलं का?
राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक आणि प्रख्यात गायिका वैशाली माडे यांचा रविवारी अकोला दौरा होता. जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या कॉलेजमध्ये हा कार्यक्रम सुरू होता. अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केल्यावर शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची “माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतिया काहिली” ही छक्कड खड्या आवाजात गायला सुरुवात केली. मात्र काही क्षणात त्यांचा आवाज चिरका व्हायला लागला, तोंड किंचित वाकडे होत असल्याची जाणीव उपस्थित काही जणांना झाली. त्यामुळे तात्काळ मिटकरींना अकोल्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी मिटकरींना अर्धांगवायूचा झटका आल्याचं वृत्त पसरलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT