राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट : मोठं कारण आलं समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली. मात्र ही भेट राजकीय कारणाने नसून कोल्हे यांच्या आगामी शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटासाठी असल्याचे समोर आले आहे. या भेटीनंतर स्वतः अमोल कोल्हे यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली.

ADVERTISEMENT

या भेटीत महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी, सध्याच्या स्थितीविषयी चर्चा झाली. तसेच कोल्हे यांनी अमित शहा यांना चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगसाठी आमंत्रण दिले, आणि उपस्थित राहण्याची विनंतीही केली. कोल्हे यांची ही विनंती शहांनी मान्य केली असून, प्राथमिक होकारही कळविला आहे. या भेटीदरम्यान कोल्हे यांनी मतदार संघातली काही मुद्द्यावरही चर्चा केल्याचे सांगितले.

काय म्हणाले डॉ. अमोल कोल्हे?

माननीय केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांची भेट घेऊन शिवप्रताप गरूडझेप सिनेमाची माहिती दिली व दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्पेशल स्क्रीनिंगसाठी वेळ देण्याची विनंती केली. ज्या घटनेने ३५६ वर्षांपूर्वी देशाचे लक्ष वेधून या मातीला स्वाभिमानाची शिकवण दिली. त्या घटनेवर आधारित शिवप्रताप गरूडझेप या सिनेमाने देशाचे लक्ष वेधावे व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशाच्या आणि पर्यायाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा हाच उद्देश!

हे वाचलं का?

तसेच यानिमित्ताने शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे-नाशिक रेल्वे, शिवसंस्कार सृष्टी आणि इंद्रायणी मेडिसिटी संदर्भातही सकारात्मक चर्चा झाली. माननीय गृहमंत्री महोदयांनी बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा चित्रपट पाहावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. खासदार कोल्हे म्हणाले, लवकरच याला मूर्त रुप येईल, अशी आमची अपेक्षा आहे. केवळ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नव्हे तर केंद्रातील जवळपास सर्वच मंत्र्यांनी आणि सर्व खासदारांनी हा चित्रपट पाहावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT