Amol Kolhe : वाऱ्याचा-पावसाचा अंदाज घेऊनच शेत नांगरणी; पक्षांतरावर कोल्हेंचं सूचक विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिरुर : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा चालू असतानाच आता त्यांनी स्वतः याबाबतच सूचक विधान केलं आहे. ते सोमवारी महात्मा फुले जयंती निमित्त तळेगाव ढमढेरे येथे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते.

ADVERTISEMENT

काय म्हणाले अमोल कोल्हे?

काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांना गैरहजर राहणारे अमोल कोल्हे सोमवारी अचानक व्यासपीठावर दाखल झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, पक्षांतराची कसली घाई करताय? पुन्हा तेच… मी शेतकऱ्यांची मुलगा आहे. त्यामुळे वारा आणि पाऊसाचा अंदाज घेऊनच शेत नांगरणी करतो. आज निवडणुका नाहीत, त्यामुळे पक्ष बदल नाही, असं विधान त्यांनी केलं. मात्र यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हे पक्ष बदल करतील असे संकेत आहेत.

खासदार डॉ. अमोल कोल्हे नेमके कुठे आहेत? ते भाजपच्या जवळ जात आहेत का? अशा चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. याचं कारण ऑक्टोबरमध्ये कोल्हेंनी अमित शहांची दिल्ली येथे घेतलेली भेट, त्यानंतर राष्ट्रवादीच्या शिर्डीतील शिबीरासह इतर कार्यक्रमांना त्यांची अनुपस्थिती आणि त्यापाठोपाठ गुजरात विधानसभेच्या स्टार प्रचारकांच्या यादीमधून अमोल कोल्हे यांना वगळं असल्याची बातमी आली होती.

हे वाचलं का?

अमोल कोल्हे पक्षावर नाराज?

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारल्याने अभिनेते असलेले डॉ. अमोल कोल्हे घराघरात पोहचले. राजकारणात त्यांची सुरुवात शिवसेनेतून झाली असली तरी पुढे त्यांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश करत शिरुर मतदार संघाची लोकसभेची निवडणूक लढवली. यात त्यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.

त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक होते. राज्यातील विविध भागांमध्ये त्यांनी सभा गाजवल्या. त्यांच्या वक्तृत्वशैलीमुळे त्यांना नेहमीच भाषणांची संधी दिली जात होती. लोकसभेत देखील त्यांनी हिंदीत केलेल्या भाषणांची बरीच चर्चा झाली होती. असं असतानाही गुजरात सारख्या महत्त्वाच्या राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारातून त्यांना वगळल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ADVERTISEMENT

या अनुपस्थितीवर पत्रकारांकडून अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आले, त्यावेळी तब्येत बरी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनासुद्धा कळवल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र ऑक्टोबरमध्ये कोल्हेंनी अमित शहांची दिल्ली येथे भेट घेतली होती. यावेळी देखील कोल्हे भाजपमध्ये जाणार का अशा चर्चा रंगल्या होत्या.

ADVERTISEMENT

परंतु ही भेट शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटाचे निमंत्रण देण्यासाठी घेतल्याचे सांगण्यात आले होते. अशातच आता स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचे नाव काढल्याने खरंच कोल्हे पक्षावर नाराज आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT