NDAला धक्का बसेल, India Today सर्व्हेवर CM शिंदे म्हणाले, कोणाला…
Chief Minister Eknath Shinde reaction on Mood of the Nation survey: मुंबई: India Today-C Voter ने काल (26 जानेवारी) एक सर्व्हे जाहीर केला. ज्यानुसार आज घडीला निवडणुका झाल्या तर देशात पुन्हा एकदा मोदी सरकार (Modi Govt) येऊ शकतं. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्रासारख्या (Maharashtra) राज्यात त्यांना मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच सर्व्हेबाबत मुख्यमंत्री एकनाथ […]
ADVERTISEMENT
Chief Minister Eknath Shinde reaction on Mood of the Nation survey: मुंबई: India Today-C Voter ने काल (26 जानेवारी) एक सर्व्हे जाहीर केला. ज्यानुसार आज घडीला निवडणुका झाल्या तर देशात पुन्हा एकदा मोदी सरकार (Modi Govt) येऊ शकतं. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्रासारख्या (Maharashtra) राज्यात त्यांना मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच सर्व्हेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) आज (27 जानेवारी) जेव्हा त्यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी हा अंदाज निवडणुकांमध्ये चुकीचा ठरेल अशी प्रतिक्रिया दिली. (nda will be shocked cm shinde reaction on india today c voter survey)
ADVERTISEMENT
पाहा India Today च्या सर्व्हेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले:
‘खरं म्हणजे मूठभर लोकांमधून सर्व्हे केल्यानंतर वस्तुस्थिती समोर येत नाही. माझ्याकडे आकडे आहेत. देशभरातील किती लोकांना भेटून हा सर्व्हे केलाय. मी त्या आकड्यांमध्ये जाऊ इच्छित नाही. परंतु मूठभर लोकांमधून सर्व्हे करून खरे आकडे, वस्तुस्थिती मांडता येणार नाही. वास्तव लोकांसमोर आणता येणार नाही.’
‘आपल्याला सांगायला आनंद होतो की, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये मिळालेलं यश जर आपण डोळ्यासमोर ठेवलं असतं तर त्यांचा जो अंदाज आहे आकड्यांचा तो जर समोर ठेवला असता तर त्याला मोठा आधार मिळाला असता.’
हे वाचलं का?
Mood Of the Nation: देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारा सर्व्हे
‘गेली अडीच वर्ष या राज्यात जे नकारात्मक काम झालं.. कोणताही प्रकल्प सुरू झाला नाही. चालू असलेले प्रकल्प बंद केले. संपूर्ण राज्यात नकारात्मक वातावरण होते. सरकार बदलल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या मंत्रिमंडळाने ज्या कामाचा धडाका लावलाय जे आम्ही राज्याच्या हिताचे निर्णय घेतोय. राज्यात दिसतंय की काम प्रगती पथावर आहे.’
ADVERTISEMENT
‘एकीकडे सकारात्मक काम करणाऱ्या लोकांना जनता मतदान करेल की, ज्यांनी प्रकल्प थांबवले त्यांना मतदान करतील? हा प्रश्न मला विचारायचा आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्यात मोठा सॅम्पल सर्व्हे मिळेल. ग्रामपंचायतीमधील सॅम्पल सर्व्हे देखील मोठा होता. ते आकडे देखील त्यांनी समोर ठेवले नाहीत.’
ADVERTISEMENT
‘येणाऱ्या महापालिका निवडणुकांमधील आकडे आणि त्याचं यश हा सगळ्यात मोठा सॅम्पल सर्व्हे असेल. त्यांनी असं धरलेलं आहे की, होणारी आघाडी, त्यांना मिळणारी मतं. आता संभाव्य आघाडीला मिळणारी मतं गृहीत धरून फक्त आकड्यांची बेरीज केली तर ते कोणीही सांगू शकेल की, असं होईल.’
‘परंतु मी आपल्याला सांगतो की, राजकारणात आणि निवडणुकांमध्ये दोन अधिक दोन चार होत नाही. त्यामुळे आता कोणाची आघाडी होईल आणि कोणाची आघाडी तुटेल हे मलाही सांगता येणार नाही. पण बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप पक्ष या राज्यात चांगलं काम करत आहे. हे सरकार लोकांचं आहे. त्यामुळे जनता कोणाला प्रतिसाद देणार आहे. हे लोकांनी ठरवलं आहे. त्याची उदाहरणं.. जनतेला प्रतिसाद समजतोय. मला एवढंच सांगायचं आहे की, त्यांनी आदरणीय पंतप्रधान मोदींना म्हणजे NDA चं सरकार येईल आणि पंतप्रधानांची लोकप्रियता वाढते हे कळतंय. मग महाराष्ट्रात काही वेगळं आहे का?’
Mood Of the Nation: लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये CM शिंदे कितव्या नंबरवर?
‘निवडणुका कधीही होऊ द्या… ते म्हणतायेत निवडणुका आता झाल्या तर.. पण आता तर निवडणुका नाही. पण आजही आम्ही आघाडीवर आहोत. जेव्हा निवडणुका होतील तेव्हा आम्ही पुढे राहणार आहेत. या राज्यातील जनतेने ठरवलेलं आहेत, त्यामुळे या सर्व्हेचा आनंद दीड वर्ष ज्याला घ्यायचाय त्याला घेऊ द्या.’
‘कोणाला हर्षवायू झाला असेल तर मी त्यांचा आनंद हिरावून घेऊ इच्छित नाही. दीड वर्ष असाच आनंद व्यक्त करू. त्यामुळे निवडणुकांची भीती आम्हाला नाही. येणारा काळच तुमच्या या सर्व्हेच्या अंदाजाला उत्तर देईल.’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र भाजपची झोप उडवणारा कौल, मविआ मारणार मुसंडी!
आजघडीला लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर महाराष्ट्रातील निकाल काय असतील? महाराष्ट्रात महाविकास आघाडी वरचढ ठरेल की, भाजपप्रणित एनडीए याबद्दल इंडिया टुडे-सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारी भाजपची चिंता वाढवणारी आहे तर महाविकास आघाडी दिलासा देणारी आहे.
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात NDA आणि UPA ला किती जागा मिळतील?
इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात NDA (भाजप, शिंदे गट आणि RPI) ला फक्त 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर UPA (मविआ) ला तब्बल 34 जागा मिळू शकतात. अशी माहिती सर्व्हेतून समोर आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT