मनसुख यांच्या मृत्यूचा तपासही NIA ने करावा – फडणवीसांची मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना NIA ने अटक केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने आणखी एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे. परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी करत हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. परमबीर यांच्या बदलीनंतरही विरोधीपक्षातील भाजपने शिवसेनेवर टीका करणं सुरुच ठेवलं आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपासही आता NIA कडे सोपवावा अशी मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

मुंबई पोलिसांचं एवढं खच्चीकरण कधीच झालं नव्हतं – आशिष शेलार

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास पहिल्यांदा ठाणे पोलीस करत होतं. परंतू विधानसभेत हा मुद्दा गाजल्यानंतर महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवला. या घटनेनंतर बराच कालावधी उलटून गेल्यानंतरही ATS ला म्हणावं तस यश लाभलेलं दिसत नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. “ATS आणि NIA कडे काही अशा टेप्स आहेत की ज्यात वाझे मनसुखला काय सांगतोय हे स्पष्ट कळतंय. इतके पुरावे असतानाही ATS कडून म्हणावी तशी कारवाई होताना दिसत नाही. ATS वर माझा विश्वास नाही अशातला भाग नाही. पण त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का?? अंबानीच्या घराबाहेरील स्कॉर्पिओ आणि मनसुख यांचा मृत्यू ही दोन्ही प्रकरण एकमेकांशी जोडली गेलेली आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तसारही NIA ने टेकओव्हर करायला हवा.”

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

२००८ मध्ये सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझेंनी काही काळ शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही काम केलं. शिवसेनेतील सक्रिय लोकांसोबत त्यांचे व्यावसायिक संबंधही होते. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार जेव्हा आलं त्यानंतर सचिन वाझेंना परत आणण्याचे प्रयत्न सुरू होते. कोरोना सुरू झाला तेव्हा ते कारण पुढे करून सचिन वाझेंना उद्धव ठाकरे सरकारने सेवेत रूजू करून घेतलं. सचिन वाझे हे हायकोर्टाच्या आदेशाने निलंबित होते त्यांना ठाकरे सरकारने सेवेत सामावून घेतलं. २०१७ मध्ये एका खंडणीच्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप होते तरीही

ADVERTISEMENT

सचिन वाझे यांनीच ‘त्या’ स्कॉर्पिओचे सीसीटीव्ही पुरावे नष्ट केले?

ADVERTISEMENT

याचसोबत सचिन वाझेंना आदेश देणारं, सगळी कारस्थानं करण्यासाठी संमती कोण देत होतं ते शोधणं आवश्यक आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली ते ठीक आहे पण सचिन वाझेंना वाचवलं का गेलं होतं? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारलं आहे.

मुंबई पोलिसांना मिळाले नवे बॉस, जाणून घ्या कोण आहेत हेमंत नगराळे?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT