भंडाऱ्यात आजपासून रात्रीची संचारबंदी लागू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विदर्भातील आणखी एका जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनाने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. भंडारा जिल्ह्यात पुढील सूचना मिळेपर्यंत रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. आज रात्रीपासूनच हा निर्णय भंडारा जिल्ह्यात लागू होणार आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान या काळात नियम मोडणाऱ्या व्यक्ती, दुकानं आणि आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. भंडारा हा जिल्हा नागपूरच्या सीमेलगत असल्यामुळे नागपुरमधील गंभीर परिस्थितीचा फटका भंडाऱ्यातही बसत असल्याचं पहायला मिळतंय.

महाराष्ट्रात काय सुरू काय बंद

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT