संजय राऊत आणि विनायक राऊत उद्धव ठाकरेंचे पाळलेले कुत्रे -नितेश राणे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांचा हवाला देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लक्ष्य केलं. शनिवारी दुपारी झालेल्या या पत्रकारबद्दल बोलताना भाजपचे नेते नितेश राणे यांनी शिवसेनेला उलट सवाल केले आहेत. त्याचबरोबर संजय राऊत आणि विनायक राऊत यांना पाळलेली कुत्री म्हणत पलटवार केला.

ADVERTISEMENT

चेंबूर येथील टिळक नगरमध्ये शिवजयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्या टीकास्त्र डागलं.

नितेश राणे काय म्हणाले?

हे वाचलं का?

“शिवसेना 2014 पासून सत्तेत आहे. 2014 ते 2019 या काळात दीपक केसरकर हे गृह राज्यमंत्री होते. आता शिवसेना सत्तेत होती. त्यांच्याकडे गृह राज्यमंत्रीपद होतं. राज्याबरोबर केंद्रातही सत्तेत होती. मग त्यांना कारवाई करण्यापासून कुणी थांबवलं होतं. विनायक राऊतांनी जे खंडण्याचे आरोप केले. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलण्यापेक्षा कारवाई करावी. तुमचे हात कुणी बांधले आहेत? तुम्ही गृहमंत्र्यांनी निवेदन कशाला देता आहात?”, असा सवाल नितेश राणे यांनी केला.

“संजय राऊत आणि विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांनी पाळलेले कुत्रे आहेत. त्यांना भुंकण्यासाठीच पदं दिलेली आहेत. आपल्याला मालका खूश करण्यासाठी ते (संजय राऊत आणि विनायक राऊत) दुपारभर भुंकत होते”, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.

ADVERTISEMENT

घराबद्दल मिळालेल्या नोटिसीबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले, “कुणीतरी तक्रार केल्यामुळे आम्हाला नोटीस देण्यात आली आहे. अनधिकृत काही गोष्टी तुमच्याकडे आहेत का? अशा संदर्भाने माहिती मागितली आहे. त्या नोटीसमध्ये कुठेही सीआरझेडचा उल्लेख नाही. या कायदेशीर नोटिसीला कायदेशीर उत्तर आम्ही देणार”, असं निलेश राणे यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

“कोकणात अशी म्हण आहे की, ज्या झाडाला जास्त आंबे असतात त्याच्यावरच जास्त दगड मारले जातात. राणे कुटुंबीय हे आंबे असलेलं झाड आहे, त्यामुळे विरोधक सध्या टार्गेट करत आहेत”, असा टोला नितेश राणे विरोधकांना लगावला.

विनायक राऊत पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते?

शनिवारी (19 फेब्रुवारी) दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार विनायक राऊत यांनी विविध घटनांचा उल्लेख करत नारायण राणेंना इशारा दिला होता.

“राणेंना वाढत्या वयामुळे विस्मरण होत असेल, मुलांच्या उपदव्यापामुळे त्यांना स्मरणात राहत नसेल तर त्यांना त्यांचा भुतकाळ सांगावा लागेल. सिंधुदुर्गात गेल्या नऊ वर्षात अनेक माऱ्यामाऱ्या झाल्या. खंडण्या उकळल्या गेल्या. मंचेकर, गोवेकर, सत्यविजय भिसे यांचा निर्घृणपणे खून कुणी केला? हे खून कुणी पचवले? श्रीधर नाईकच्या खुनात आरोपी कोण होतं? आम्हाला उघड करायला लावू नका. नऊ वर्षात सिंधुदुर्गात सात राजकीय हत्या झाल्या आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन याची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत”, असं विनायक राऊत म्हणाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT