नितीन गडकरी म्हणतात, ‘महाराष्ट्राचा नेता पंतप्रधान व्हावा, असं मला अजिबात वाटत नाही’
राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी स्वतःचा ठसा उमटवला, पण स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही मराठी माणसाला देशाचं पंतप्रधान होता आलेलं नाही. त्यामुळे मराठी माणूस कधी पंतप्रधान होईल, असा प्रश्न वारंवार उपस्थित होत असतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही हाच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नितीन गडकरी यांनी आपली भूमिका मांडली. तसेच मराठी माणसाला पंतप्रधानपदाची संधी कधी मिळेल, याबद्दलही […]
ADVERTISEMENT
राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी स्वतःचा ठसा उमटवला, पण स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही मराठी माणसाला देशाचं पंतप्रधान होता आलेलं नाही. त्यामुळे मराठी माणूस कधी पंतप्रधान होईल, असा प्रश्न वारंवार उपस्थित होत असतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही हाच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नितीन गडकरी यांनी आपली भूमिका मांडली. तसेच मराठी माणसाला पंतप्रधानपदाची संधी कधी मिळेल, याबद्दलही त्यांनी भाष्य केलं.
ADVERTISEMENT
एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राजकारणासह विविध मुद्द्यांवर संवाद साधला. देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असतानाही महाराष्ट्रातील एकही नेता पंतप्रधान का होऊ शकला नाही? असा प्रश्न नितीन गडकरी यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी यांनी राजकीय भाष्य केलं.
नितीन गडकरी म्हणाले,’महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे; मग त्याची जात, धर्म, पंथ आणि राज्य कोणतंही असो! मराठी माणूसच झाला पाहिजे किंवा महाराष्ट्रातीलच झाला पाहिजे, असं काही मला मान्य नाही. उद्या जर, एखादा मराठी माणूस त्या पात्रतेचा असेल, तर तो पंतप्रधान होईल; त्याला ती संधी मिळेल’, असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.
हे वाचलं का?
यावेळी नितीन गडकरी यांनी विविध महत्त्वकांक्षी रस्ते प्रकल्पांचीही माहिती दिली. सूरतपासून नाशिक, नाशिकहून अहमदनगर आणि अहमदनगरहून सोलापूर असा नवा महामार्ग तयार केला जाणार आहे’, असं गडकरी यांनी सांगितलं. या महामार्गामुळे पुणे-मुंबईची वाहतूक कोंडी ५० टक्क्यांनी कमी होईल. त्याचबरोबर मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेमुळेदेखील आपण प्रदूषणही कमी करु’, असं मत गडकरींनी मांडलं.
‘इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, सीएनजी यांचा वापर करण्याची गरज आहे. पुण्यात ऑटो रिक्षा, स्कूटर या ताबडतोब इथेनॉलवर चालवाव्यात, असा माझा सातत्यानं आग्रह आहे. पंतप्रधानांनी दोन पेट्रोलपंपांचं उद्घाटनही केलं आहे. त्यामुळे याबाबत महाराष्ट्र सरकारनं पुढाकार घेतला, तर कोरोनाच्या काळातही विकास दर वाढण्यास मदत होईल’, असं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT