बँकांमधली ‘नेते’गिरी आता थांबणार ! पदवी नसेल तर आमदार-खासदार-नगरसेवकांना No Entry
राजकारणातील खासदार, आमदार इतकच काय तर अनेक नगरसेवक मंडळीही आपल्याला शहरातील सहकारी बँका, खासगी बँकेच्या संचालक पदावर काम करताना आढळतात. बँकेच्या संचालक मंडळावर राजकीय नेत्यांना स्थान दिल्यानंतर त्यानंतर होणाऱ्या आर्थिक घोटाळ्याची अनेक उदाहरण महाराष्ट्रासमोर आहेत. परंतू बँकेतल्या या नेतेगिरीला आता चाप बसणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमामुळे लोकप्रतिनिधींसाठी आता बँकेचे दरवाजे बंद झाले आहेत. संचालकपदी […]
ADVERTISEMENT
राजकारणातील खासदार, आमदार इतकच काय तर अनेक नगरसेवक मंडळीही आपल्याला शहरातील सहकारी बँका, खासगी बँकेच्या संचालक पदावर काम करताना आढळतात. बँकेच्या संचालक मंडळावर राजकीय नेत्यांना स्थान दिल्यानंतर त्यानंतर होणाऱ्या आर्थिक घोटाळ्याची अनेक उदाहरण महाराष्ट्रासमोर आहेत. परंतू बँकेतल्या या नेतेगिरीला आता चाप बसणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमामुळे लोकप्रतिनिधींसाठी आता बँकेचे दरवाजे बंद झाले आहेत.
ADVERTISEMENT
संचालकपदी निवड करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने वय-शिक्षणासह अनेक अटी घातल्या आहेत. सहकारी बँकेच्या कार्यकारी संचालक पदाचा आणि पूर्णवेळ संचालक पदाचा कार्यकाळ हा ५ वर्षेच राहणार आहे. हा कार्यकाळ वाढवायचा असेल किंवा नवीन नियुक्ती करायची असेल तर त्यासाठी दोन महिन्यांत रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळवणं बंधनकारक करण्यात आलंय.
काय आहेत रिझर्व्ह बँकेचे नवीन नियम, जाणून घ्या…
हे वाचलं का?
-
खासदार, आमदार, नगरसेवक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील कोणत्याही लोकप्रतिनीधीची नियुक्ती आता कार्यकारी संचालक पदावर करता येणार नाही. उद्योगाशी संबंधित किंवा कंपनीत भागीदार असणाऱ्या लोकांची नियुक्तीही करता येणार नाही.
पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच जर कार्यकारी किंवा पूर्णवेळ संचालकांना हटवायचं असेल तर रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणं आवश्यक
ADVERTISEMENT
कार्यकारी संचालक किंवा पूर्णवेळ संचालक हा किमान पदवीधर असावा. तसेच सीए, एमबीए (फायनान्स), बँकिंगमधील डिप्लोमा, द्विपदवीधारक अशा प्रकारचं अतिरीक्त शिक्षण घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल.
ADVERTISEMENT
कार्यकारी आणि पूर्णवेळ संचालकांचं वय किमान ३५ आणि कमाल ७० वर्ष इतकच असावं. बँकिंग सेक्टरमध्ये किमान ८ वर्षांचा अनुभव असणं बंधनकारक आहे.
सहकारी बँकांची संपत्ती ही ५ हजार कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर चिफ रिस्क ऑफिसरची नियुक्ती करणं बंधनकारक आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT