माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करा संजय राऊत यांचे घोटाळे बाहेर काढणारच-किरीट सोमय्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोव्हिड घोटाळ्याबाबत संजय राऊत एक शब्दही का बोलले नाहीत? 19 बंगल्यांच्या संदर्भात रश्मी ठाकरेंनी ग्रामपंचायतीची माफी मागितली हे त्यांनी का सांगितलं नाही? असे प्रश्न उपस्थित करत किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांना प्रतिआव्हान दिलं आहे. एवढंच नाही तर माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करा मी घाबरणार नाही. संजय राऊत यांचे घोटाळे बाहेर काढणारच असं प्रतिआव्हान किरीट सोमय्यांनी दिलं आहे. तसंच माझ्यावर केलेले सगळे आरोप बिनबुडाचे आहेत असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

मुंबई आणि पुणे येथील कोव्हिड सेंटर घोटाळा मी बाहेर काढला त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेही घाबरले आहेत. त्यामुळेच लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळे विषय समोर आणले जात आहेत. माझ्याकडून चूक झाली असेल तर जी कारवाई करायची असेल तर मी कारवाईला समोर जायला तयार आहे असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले किरीट सोमय्या?

हे वाचलं का?

अलिबागमधील 19 घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. तसेच मनिषा रविंद्र वायकर यांनी देखील त्याचा टॅक्स भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आज किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी अलिबागमधील 19 बंगले ठाकरे यांचेच असल्याचे सांगितले. बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे संजय राऊत आता जोड्यानं कुणाला मारणार? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.

‘बाप-बेटे जेलमध्ये जाणार! कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू’ संजय राऊत यांचं ट्विट चर्चेत

ADVERTISEMENT

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते किरीट सोमय्यांबाबत?

ADVERTISEMENT

ईडीच्या धाडी पडण्याआधी मुलुंडचा दलाल पत्रकार घेऊन सांगतो की, संजय राऊतांना अटक होणार आहे. आता ईडीचे लोक त्यांच्या घरी पोहोचणार आहे. या व्यक्तीच्या घरी पोहोचणार आहे. हा काय प्रकार आहे. तुमचं सरकार आलं नाही, म्हणून आम्हाला त्रास देता. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला गुडघे टेकवायला शिकवलं नाही, हे विसरू नका.

किरीट सोमय्या हे उद्धव ठाकरे यांचे १९ बंगले असल्याचा आरोप करतात. आपण सगळे जण एक दिवस त्या बंगल्यात पिकनिक काढू. जर ते बंगले तुम्हाला दिसले, तर मी राजकारण सोडेन. जर नसतील, तर मुलुंडच्या त्या दलालाला जोड्याने मारू असा इशारा राऊत यांनी सोमय्यांना दिला. दररोज भपंकपणा सुरू आहे. लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचं काम सुरू आहे असंही संजय राऊत म्हणाले होते. आता आज याच आरोपांना किरीट सोमय्या उत्तर देणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT