Monsoon in Maharashtra : राज्यात पुढील आठवडाभर पावसाची विश्रांती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या आठवडाभरापासून राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतलेली आहे. राज्यात पुढील आठवडाभर पावसाचा जोर अत्यंत कमी असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाने उसंत घेतलेली असून बऱ्याच ठिकाणी उकाडा वाढलेला आहे.

ADVERTISEMENT

राज्यात सध्या मोसमी वारे सक्रीय असले तरीही सहारा भागामधून येणाऱ्या धुळीच्या कणांमुळे सध्या ढगांच्या निर्मितीला पोषक वातावरण राज्यात नाही. यामुळेच राज्यात पुढील आठवडाभर पावसाचं प्रमाण कमी असेल असा अंदाज हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी भागातही हीच परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्याच्या अनेक भागांमध्ये पूर्वमोसमी आणि मोसमी पावसाचं आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्यांची काम हाती घेतली होती. पावसाच्या विश्रांतीमुळे या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. मुंबई शहरातही पावसाने काल दिवसभर उसंत घेतली असून शहर आणि त्याचसोबत पूर्व उपनगरं आणि पश्चिम उपनगरातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT