मुंबईत पुढील दोन दिवसांसाठी सरकारी केंद्रावर Corona Vaccination बंद

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाविरुद्ध लढाईत देशभरात सरकारी यंत्रणा लसीकरणावर भर देत असताना मुंबईत मात्र नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. १९ आणि २० ऑगस्ट या दोन दिवशी मुंबईत सरकारी केंद्रांवर कोरोनाचं लसीकरण बंद राहणार आहे. गेल्या आठवड्यातही गुरुवारी आणि शुक्रवारी लसीकरण बंद ठेवण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

मुंबईत राज्य सरकारने लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. परंतू सरकारी लसीकरण केंद्रांवर अपुऱ्या साठ्यामुळे वारंवार केंद्र बंद ठेवण्याची पाळी येत असल्यामुळे सामान्य मुंबईकरांमध्ये नाराजी आहे. लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे १९ आणि २० तारखेला लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

गुरुवारी लसींचा साठा आल्यानंतर शुक्रवारी सर्व केंद्रावर तो वितरीत केला जाईल. यानंतर शनिवारी पुन्हा एकदा सरकारी केंद्रांवर लसीकरण सुरु होईल अशी माहिती महापालिकेने दिली आहे. जनतेने प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेने केलं आहे. दरम्यान लसीकरण बंद असल्याच्या पूर्वसूचना नागरिकांना देण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

हे वाचलं का?

मुंबईत चित्रपट कामगारांसाठी Vaccination

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT