मुंबईत पुढचे तीन दिवस Vaccination होणार नाही, लसींचा साठा संपला
मुंबईत पुढचे तीन दिवस Vaccination होणार नाही कारण मुंबईत लसीच उपलब्ध नाहीत. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे. त्यामुळे मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण बंद राहणार आहे. जेव्हा लसी आम्हाला उपलब्ध होतील तेव्हा आम्ही नोंदणी केलेल्या लोकांना मेसेज पाठवू, मुंबईकरांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असंही आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे. Contact information of all […]
ADVERTISEMENT
मुंबईत पुढचे तीन दिवस Vaccination होणार नाही कारण मुंबईत लसीच उपलब्ध नाहीत. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे. त्यामुळे मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण बंद राहणार आहे. जेव्हा लसी आम्हाला उपलब्ध होतील तेव्हा आम्ही नोंदणी केलेल्या लोकांना मेसेज पाठवू, मुंबईकरांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असंही आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
Contact information of all COVID-19 Testing Facilities in Mumbai.
मुंबईतील सर्व कोविड-१९ तपासणी केंद्रांच्या संपर्काची माहिती.#NaToCorona
(1/2) pic.twitter.com/oOvH2b4Ozu
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 29, 2021
1 मे नंतर महाराष्ट्रातल्या 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण शक्य आहे का ?
खरं तर महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा भासतो आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतही लसींचा साठा संपला आहे त्यामुळे आता पुढचे तीन दिवस लसीकरण बंद राहणार आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली. रविवारपर्यंत नव्या पुरवठ्यासंदर्भातली माहिती मिळेल. सोमवारपासून पुन्हा आम्ही लसीकरण सुरू करू शकू असंही त्यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
आमच्याकडे असलेला साठा संपल्यात जमा आहे त्यामुळे पुढचे तीन दिवस लसीकरण मोहीम बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना आणि खासकरून ज्येष्ठ नागरिकांना हे आवाहन आहे की त्यांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. मुंबईतल्या सगळ्याच लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आला आहे. मुंबईसाठी 76 हजार डोस मिळाले होते त्यापैकी 50 हजार डोस दुपारपर्यंत संपले असून उरलेलेही डोस संपतील. त्यामुळे पुढील साठा उपलब्ध होत नाही तोवर लसीकरण बंद राहणार आहे. केंद्र सरकारने विशेष बाब म्हणून साठा उपलब्ध करून दिला तर लसीकरण करता येईल असंही काकाणी यांनी स्पष्ट केलं.
‘1 मे रोजी लसीच उपलब्ध झाल्या नाहीत तर…’ राजेश टोपे म्हणतात
ADVERTISEMENT
मुंबईमध्ये कोरोनाचे रूग्ण कमी होत आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. लॉकडाऊनही आणखी पंधरा दिवस वाढण्याची शक्यता आहे. कालच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रातील रूग्णसंख्या वाढत असताना लसीकरण हा मोठा आधार आहे मात्र लसीकरणातही अडचणी येत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये लसींचा तुटवडा जाणवतो आहे. महाराष्ट्राला लसी मिळत आहेत मात्र त्यांचा साठा मर्यादीत आहे. ज्या लसी मिळत आहेत त्यापेक्षा जास्त महाराष्ट्राची मागणी आहे. आम्हाला लसीच उपलब्ध झाल्या नाहीत तर 1 मेपासून आम्ही लसीकरण कसं सुरू करणार असाही प्रश्न राजेश टोपे यांनी बुधवारीच उपस्थित केला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT