Devendra Fadnavis : “विदर्भच नाही आता संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही मोठा पक्ष आहोत”
फक्त विदर्भच नाही तर मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, कोकण सगळ्या महाराष्ट्रात आता भाजपच मोठा पक्ष आहोत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केलं आहे. एवढंच नाही चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं कौतुकही देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नेमकं काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस? चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचा आवाका प्रचंड आहे. आमच्या […]
ADVERTISEMENT
फक्त विदर्भच नाही तर मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, कोकण सगळ्या महाराष्ट्रात आता भाजपच मोठा पक्ष आहोत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केलं आहे. एवढंच नाही चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं कौतुकही देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचा आवाका प्रचंड आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे आमचा पक्ष आणखी वाढेल आणि भाजपची पाळंमुळं राज्यात अधिक घट्ट होतील याबाबत माझ्या मनात काहीही शंका नाही. चंद्रशेखर बावनकुळे हे खूप काळापासून भाजप कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. जिल्हा परिषद, विरोधीपक्ष नेते, आमदार, मंत्री अशा विविध पदांवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी काम केलं आहे. पक्षाने ज्या ज्या वेळी त्यांना जबाबदारी दिली त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळली असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच राज्यात आता आम्ही सर्वात मोठा पक्ष आहोत असंही वक्तव्य केलं.
चंद्रशेखर बावनकुळे यांचं देवेंद्र फडणवीस यांनी केलं कौतुक
उर्जामंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या कामाचा चांगला इम्पॅक्ट बघायला मिळाला. प्रदेश महामंत्री म्हणून त्यांच्याकडे काही दिवस जबाबदारी होती. त्यावेळी राज्यभर फिरून त्यांनी भाजपची बांधणी केली. ओबीसी समाजाच्या बांधवांच्या प्रश्नांवरही चंद्रशेखर बावनकुळे लढले. ज्यावेळी ओबीसींचं आरक्षण गेलं त्यावेळी त्यांनी प्रयत्नांची शर्थ केली. त्यामुळे ओबीसींचा चेहरा म्हणून तर ते आहेतच. याशिवाय आमची ताकद आधी विदर्भात जास्त होती आता पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात आम्ही मोठा पक्ष आहोत.
हे वाचलं का?
खातेवाटप कधी होणार असं विचारल्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यानंतर आता खातेवाटप झालेलं नाही. खातेवाटपाबाबत नाराजी आहे असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले तुम्हाला तुमची काय पतंगबाजी करायची आहे करा आम्ही खातेवाटप लवकरच करू असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा होताच बावनकुळेंनी त्यांचे लोकसभा आणि विधानसभेतील टार्गेटही सांगून टाकले आहे. लोकसभेमध्ये भाजपा आणि शिवसेना मिळून 45पेक्षा जास्त जागा निवडून आणणारच आणि येथे विधानसभेमध्ये 200पेक्षा जास्त जागा निवडून आणणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल. किती नुकसान झालं त्याची आकडेवारी गोळा करणं सुरू आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT