Karuna Sharma यांच्या Facebook Live नंतर धनंजय मुंडेंनी पाठवली नोटीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

करूणा शर्मा यांनी Facebook Live करून 5 सप्टेंबरला पत्रकार परिषद घेणार असल्याचं त्या लाईव्हमध्ये सांगितलं होतं. ज्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वकील सुषमा सिंह यांच्यामार्फत सगळ्या प्रसारमाध्यमांना पत्र पाठवले आहे. तर करूणा शर्मांना नोटीस धाडली आहे.

काय म्हटलं आहे धनंजय मुंडेंच्या वकील सुषमा सिंह यांच्या पत्रात?

करुणा शर्मा यांनी केलेल्या आरोपानंतर आता परळी येथून पत्रकार परिषद घेत विविध कॉल रेकॉर्ड, What’s App Chat यासारखे साहित्य प्रसिद्धीस देणार असल्याचे जाहीर केलं. परंतु या प्रकरणात 28 जानेवारी 2021 झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट व संवेदनशील असल्याने धनंजय मुंडे किंवा करुणा शर्मा यांच्याबद्दलचे कोणतेही खासगी साहित्य प्रसिद्ध किंवा प्रकाशित करण्यात निर्बंध घातलेले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

असं असूनही करुणा शर्मा यांनी जाहीर केलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी असे कोणतेही साहित्य प्रसिद्ध किंवा प्रकाशित करण्याचा प्रयत्न केल्यास तो उच्च न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. न्यायिक प्रक्रियेनुसार कोणत्याही प्रसिद्धी माध्यमाने ते साहित्य प्रसिद्ध करणे देखील उच्च न्यायालयाचा अवमानच ठरतो, त्यामुळे अशा कोणत्याही साहित्याला प्रसिद्धी माध्यमांनी प्रकाशित किंवा प्रसिद्ध करू नये असे पत्र धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणातील वकील श्रीमती सुषमा सिंह यांनी सर्व प्रसारमाध्यमांना पाठवले आहे.

आणखी काय म्हटलं आहे या पत्रात?

ADVERTISEMENT

या प्रकरणात सातत्याने विविध प्रकारचे आरोप करून बदनामी करत मोठ्या स्वरूपात ब्लॅकमेलिंग केली जात असल्याचे यापूर्वीच धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेले आहे. तसेच सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे अशा स्वरूपातील कोणतेही साहित्य प्रसिद्ध करणे हे त्या प्रकरणाच्या निकालावर देखील परिणामकारक ठरू शकते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचा अवमान केला जाऊ नये असे ऍड. सुषमा सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

ADVERTISEMENT

करूणा शर्मा यांनी बारा तासांपूर्वी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय?

बीड मधील जनतेचा आशीर्वाद आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद करून समस्या जाणून अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाहणी करून गावकरी संवाद साधनार आहे. 5/9/021 रविवारी 12 वाजता परळी वैजनाथ मधील लोकांसमोर काही गोष्टींचा खुलासाही करणार आहे. या लाईव्ह दरम्यान माझ्यावर आईवर, बहिणीवर, मुलांवर झालेल्या अत्याचाराबद्दल . तसेच मुलांना कशाप्रकारे धमकीचे फोन येत आहेत याबाबत देखील मी रविवारी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टींचा खुलासा करणार आहेत. तरी सर्व पत्रकार बांधवांनी रविवारी 12 वाजता परळी वैजनाथ मंदिर मध्ये उपस्थित राहावे

आपली नम्र

सौ. करुणा धनंजय मुंडे /

काय आहे प्रकरण?

जानेवारी महिन्यात एका तरूणीने धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. ज्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती त्यामध्ये करूणा शर्मा यांच्यासोबत असलेले त्यांचे संबंध त्यांनी मान्य केले होते. तसंच त्यांच्यापासून झालेल्या मुलांना आपण आपलं नाव दिल्याचंही जाहीर केलं होतं. माझ्यावर झालेले आरोप बदनामीच्या हेतूने होत आहेत असंही धनंजय मुंडे यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. काही दिवसांपूर्वीच करूणा शर्मा यांनी फेसबुक लाईव्ह करत 5 सप्टेंबरला पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं होतं. ज्यानंतर धनंजय मुंडे यांनी वकिलांच्या मार्फत त्यांना नोटीस आणि मीडियाला यासंदर्भातल्या कोणत्याही बाबींना प्रसिद्धी देऊ नये असे पत्र पाठवले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT