वांद्रे परिसरातील बेहरामपाडामध्ये इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्य; ५ जण जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत रविवारी रात्री वांद्रे परिसरातील बेहरामपाडा भागात एका इमारतीचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चौघे जण जखमी झाले आहेत. रात्री दोन वाजल्याच्या सुमारास रझाक चाळ इमारतीचा एक भाग अचानक कोसळला.

ADVERTISEMENT

रविवारी रात्री मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे अग्निशमन दलाला बचावकार्यात अनेक अडथळे येत होते. अखेरीस या भागातून १७ जणांना बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे.

हे वाचलं का?

अपघाताची माहिती मिळताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या भागात कामगार पाठवण्याची विनंती केली, परंतू महापालिकेने फक्त दोन कामगार घटनास्थळी पाठवले. रात्री स्थानिकांच्या मदतीने बचावकार्याचं काम सुरु असल्याचा आरोप आमदार झिशान सिद्दीकी यांनी केला. मुंबईत इमारती कोसळून अपघात होण्याच्या घटना नवीन नाहीत. परंतू मान्सूनला सुरुवात होण्याआधीच अशा घटना घडायला सुरुवात झाल्यामुळे मुंबईकरांमध्ये धास्तीचं वातावरण आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT