Oppo ने लाँच केला नवा फोन, पाहा फीचर्स आणि किंमत

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

Oppo आपला नवा बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा बजेट स्मार्टफोन असून Oppo A16 सीरीजचा आहे.

हे वाचलं का?

कंपनीने याचं नाव Oppo A16 K ठेवलं आहे. हा स्मार्टफोन ड्रॉपलेट नॉच डिझाइनचा आहे.

ADVERTISEMENT

हा स्मार्टफोन सध्या फिलिपाईन्समध्ये उपलब्ध आहे. लवकरच हा भारतात देखील लाँच केला जाऊ शकतो.

ADVERTISEMENT

Oppo A16 K ची फिलिपाईन्समध्ये किंमत PHP 6,999 (जवळजवळ 10,300 रुपये) आहे.

हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्ल्यू आणि व्हाईट या तीन रंगामध्ये उपलब्ध आहे.

Oppo A16 K मध्ये 6.52 इंचीचा IPS HD + डिस्प्ले 720×1600 रेझ्युलेशनसह देण्यात आला आहे.

यामध्ये 13 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तर याचा फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे.

या स्मार्टफोनमध्ये Helio G35 प्रोसेसर देण्यात आलं आहे. यामध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल मेमरीसाठी ऑप्शन उपलब्ध आहेत.

यामधील मेमरी स्लॉटने मेमरीला microSD कार्डच्या मदतीने वाढवता येईल. हा फोन Android 11 बेस्ड ColorOS 11.1 वर आधारित आहे.

यामध्ये 4230 mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये microUSB पोर्टने रिचार्ज करता येणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये ड्यूअल सिम स्लॉट, Wi-Fi 5, 4G VoLTE, GPS, Bluetooth 4.2 आणि 3.5mm ऑडिओ पोर्ट देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT