Opposition March : ‘आम्हाला पाकिस्तानाच्या सीमेवर असल्यासारखं वाटत होतं’
संसदेचं अधिवेशन वेळेआधीच उरकल्यानं विरोधकांकडून केंद्रावर आगपाखड केली जात आहे. अधिवेशनादरम्यान, राज्यसभेत काल (११ ऑगस्ट) झालेल्या गदारोळावरून आणि महिला खासदारांसोबत गैरवर्तन झाल्याच्या मुद्यावरून शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकेचा बाण डागला. संसदेत काल जे घडलं, ते बघून पाकिस्तानच्या सीमेवर असल्यासारखं वाटतं होतं, अशी टीका संजय राऊत यांनी केली. पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी पेगॅसस […]
ADVERTISEMENT
संसदेचं अधिवेशन वेळेआधीच उरकल्यानं विरोधकांकडून केंद्रावर आगपाखड केली जात आहे. अधिवेशनादरम्यान, राज्यसभेत काल (११ ऑगस्ट) झालेल्या गदारोळावरून आणि महिला खासदारांसोबत गैरवर्तन झाल्याच्या मुद्यावरून शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकेचा बाण डागला. संसदेत काल जे घडलं, ते बघून पाकिस्तानच्या सीमेवर असल्यासारखं वाटतं होतं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
ADVERTISEMENT
पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी पेगॅसस हेरगिरी, कृषी कायदे यासह विविध मुद्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधकांचा संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांचा गोंधळ कायम राहिल्यानं सरकारनं अधिवेशन निर्धारित वेळेआधीच गुंडाळलं. यात विमा विधेयक चर्चेविनाच मंजूर केलं, तर कृषी विधेयकावर चर्चाच न केल्यानं विरोधक गुरूवारी (१२ ऑगस्ट) रस्त्यावर उतरले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मार्चमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊतही सहभागी झाले होते. यावेळी बोलताना राऊत यांनी सरकारला लक्ष्य केलं. ‘संसदेत विरोधकांना त्यांची बाजू मांडण्याची संधीच देण्यात आली नाही. काल संसदेत महिला खासदारांसोबत जे काही घडलं, ते लोकशाहीविरोधी होतं. आम्हाला असं वाटलं की, आम्ही पाकिस्तानच्या सीमेवर उभे आहोत’, अशा शब्दात संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला.
हे वाचलं का?
विरोधकांचा संसद ते विजय चौक मार्च
पावसाळी अधिवेशनात सरकारने कृषी विधेयकांवर चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. मात्र, कृषी विधेयकांवर कोणतीही चर्चा न झाल्यानं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसदेपासून विजय चौक असा मार्च काढण्यात आला. काँग्रेसह इतर विरोधी पक्षांचे नेतेही या मार्चमध्ये सहभागी झाले असून, दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे.
ADVERTISEMENT
…ही तर लोकशाहीची हत्या -राहुल गांधी
ADVERTISEMENT
मार्च सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं. संसदेत बोलण्याची संधी न दिल्यानं आम्ही इथे माध्यमांशी बोलायला आलोय. अधिवेशन संपलं आहे. देशातील ६० टक्के जनतेचा आवाज दाबण्यात आला. काल राज्यसभेत अवहेलना करण्यात आली, हल्ला करण्यात आला. ही लोकशाहीची हत्या आहे’, असा घणाघात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT