उस्मानाबाद : धारासूरमर्दिनी मंदिरात ३४० फुटांची भव्य रांगोळी, दुर्गारुपी स्त्रीशक्तीला मानवंदना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उस्मानाबादकरांचे ग्रामदैवत धारासूरमर्दिनी मंदिराच्या सभागृहात कलायोगी आर्ट्सचे राजकुमार कुंभार यांनी तब्बल 340 चौरस फुटांची भव्यदिव्य रांगोळी काढून नारीशक्तीचा संदेश आपल्या रांगोळीमधून दिला आहे. सहकार्‍यांच्या मदतीने तब्बल 13 तास मेहनत घेऊन काढलेली ही रांगोळी भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.

ADVERTISEMENT

या रांगोळी मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, रमाई आंबेडकर झाशीची राणी लक्ष्मीबाई, आनंदीबाई जोशी, सिंधुताई सपकाळ, किरण बेदी, कल्पना चावला या स्त्रीशक्तींना मानवंदना देण्यात आली आहे. रांगोळीमध्ये देवीच्या वेशभूषा असलेली लहानशी निरागस चिमुकली 17 बाय 20 फुट आकारात साकारलेली आहे.

हे वाचलं का?

या रांगोळीसाठी कलायोगी आर्ट्सचे संचालक राजकुमार कुंभार यांच्या मार्गदर्शनात स्वप्नील कुंभार, दीपराज भोकरे, निकीता लाड, शंखिनी साखरे, जय पंडीत या विद्यार्थ्यांनी तब्बल 13 तास परिश्रम घेतले. रांगोळी साकारण्यासाठी 45 किलो रांगोळीचा वापर करण्यात आल्याचे राजकुमार कुंभार यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT