Oxygen तुटवड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना फोन, मोदी प्रचारात असल्याने होऊ शकलं नाही बोलणं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात ऑक्सिजनचा भीषण तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुखअयमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासाठी फोन केला आहे. मात्र फोनवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे बोलणे होऊ शकले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होऊ शकली नाही. पंतप्रधान तुमच्याशी संपर्क करतील असा निरोप उद्धव ठाकरे यांना देण्यात आला. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासाठी मदत करावी अशी विनंती करण्यासाठी हा फोन मुख्यमंत्र्यांनी केला होता. रेमडेसिवीरचा तुटवडा आणि ऑक्सिजनचा तुटवडा या दोन विषयांवर ते बोलणार होते. महाराष्ट्रात सध्या 1200 ते 1500 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मुंबईतल्या भगवती हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपल्याने रूग्णांना दुसऱ्या रूग्णालयात हलवावं लागलं या सगळ्या गोष्टीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगणार होते.

महाराष्ट्रात रूग्णसंख्या वाढू लागली आहे. राज्यात 16 एप्रिलला समोर आलेल्या संख्येनुसार 63 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह होते. तर दिवसभरात 398 मृत्यूंची नोंद झाली. आता ऑक्सिजनचा पुरवठाही कमी पडू लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा अशी मागणी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. कोव्हिड रूग्णांची संख्या रोज वाढते आहे त्यासाठी केंद्र सरकारने आता मदत करावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

Oxygen Plant: हवेतून दर तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन निर्मिती, महाराष्ट्रात कुठे सुरु होणार प्लांट?

राजेश टोपे यांनी काय म्हटलं होतं?

ADVERTISEMENT

ऑक्सिजनची कमतरता राज्याला भासते आहे. महाराष्ट्रात जो काही ऑक्सिजन तयार होतो आहे तो सगळा ऑक्सिजन हा कोरोा रूग्णांसाठी वापरण्यात येतो आहे तरीही हा तुटवडा भासतो आहे. रूग्णसंख्या वाढते आहे, अॅक्टिव्ह केसेस वाढत आहेत त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. इंडस्ट्रीजसाठी आम्ही ऑक्सिजन देत नाही तो सगळा ऑक्सिजनही इथेच वापरत आहोत तरीही ऑक्सिजन कमी पडतो आहे. बाहेरून ऑक्सिजन आणण्याची गरज भासू लागली आहे. जम्बो आणि ड्युरा सिलेंडर वापरू नका असंही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. लिक्विड ऑक्सिजन स्टोअरेज टँक सुविधा निर्माण करण्याच्या सूचनाही आम्ही दिल्या आहेत. त्या पद्धतीने निधीही उपलब्ध करून दिले आहेत.

ADVERTISEMENT

सर्व राज्यं आणि जिल्ह्यांमध्ये हे काम सुरू झालं आहे. त्यामुळे केंद्र शासनाला आम्ही मागणी केली आहे की आम्हाला ऑक्सिजन पुरवावा. छत्तीसगढ, तेलंगण, कर्नाटक, ओडिसा या राज्यांमधूनही ऑक्सिजन आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जिल्हा पातळीवर खासगी रूग्णालयांसाठी नव्या तंत्रज्ञानाने म्हणजे प्रेशर स्विंग अॅबझॉर्शन ऑक्सिजन टेक्नॉलॉजी म्हणतो.. ती म्हणजे हवेतला ऑक्सिजन घेऊन 98 टक्के प्युअर ऑक्सिजन तयार करतो आहोत. तरीही केंद्राने मदत केली पाहिजे असंही राजेश टोपे यांनी मुंबई तकशी संवाद करताना सांगितलं होतं. आम्हाला सर्वात मोठा प्रॉब्लेम वाटतो तो ऑक्सिजनचाच आहे. त्याचा तुटवडा भासू नये म्हणून केंद्राने मदत करावी असंही राजेश टोपे यांनी म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT