पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी का केलं भारताचं कौतुक, काय म्हणाले इम्रान खान?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सध्या पाकिस्तानातील पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आलेला असून, राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा वातावरणातच पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचं कौतुक केलं. इम्रान खान यांच्या या भाषणाची भारतात चर्चिलं जात आहे.

ADVERTISEMENT

पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी एका कार्यक्रमात विरोधी पक्ष आणि पाकिस्तानी लष्करावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पक्षातून बाहेर पडलेल्या बंडखोरांबद्दलही भाष्य केलं. पक्ष सोडून गेलेल्या माफ करू असं इम्रान खान म्हणाले. पाकिस्तानातील विरोधक आणि लष्करावर टीका करतानाच पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचं कौतुक केलं.

पंतप्रधान इम्रान खान म्हणाले…

हे वाचलं का?

“मी आज भारताची प्रशंसा करतो. भारताने नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरणं स्वीकारलं. क्वॉडमध्येही (Quadrilateral Security Dialogue) भारताची अमेरिकेसोबत आघाडी आहे आणि तरीही ते स्वतःला तटस्थ म्हणतात. निर्बंध लादलेले असताना रशियाकडून तेलाची आयात करत आहेत. कारण भारताचं धोरण हे त्यांच्या लोकांसाठी आहे,” असं इम्रान खान म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “अमेरिकेला पाकिस्तानात लष्करी तळ बनवू दिलं जावं, असं मला सांगितलं गेलं होतं. मी २५ वर्षांत कुणासमोर झुकलो नाही आणि झुकणार नाही. आम्ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुमच्यासोबत आहोत, मात्र युद्धात नाही,” असं म्हणत इम्रान खान यांनी अमेरिकेवर निशाणा साधला.

ADVERTISEMENT

२५ मार्च रोजी इम्रान खान सरकारची परीक्षा

ADVERTISEMENT

पाकिस्तानात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. इम्रान खान यांच्या सरकारला साडेतीन वर्ष पूर्ण झाली असून, आता मध्येच त्यांच्या सरकारविरोधात हा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. २५ मार्च रोजी पाकिस्तानच्या संसदेत या अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे.

पाकिस्तानातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यामुळे इम्रान खान यांचं सरकार संकटात असल्याची चर्चा आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली सरकार सगळ्यात वाईट काळातून जात असल्याचंही बोललं जात आहे. विरोधी पक्षांचे नेते शहबाज शरीफ, आसिफ अली झरदारी आणि मौलाना फजलुर्रहमान यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांना १७२ पेक्षा अधिक खासदारांचं समर्थन असल्याचा दावा केलेला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT