Pandharpur By-election Result: पंढरपुरात भाजपकडून राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’, समाधान आवताडेंचा निर्णायक विजय
नितीन शिंदे पंढरपूर: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक ही अत्यंत अटीतटीची ठरली आहे. पण या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी अखेरच्या क्षणी विजय मिळवला आहे. या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांचा जवळजवळ 3733 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. मागील काही दिवसांपासून पंढरपूर पोटनिवडणुकीकडे अवघ्या […]
ADVERTISEMENT
नितीन शिंदे
ADVERTISEMENT
पंढरपूर: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक ही अत्यंत अटीतटीची ठरली आहे. पण या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी अखेरच्या क्षणी विजय मिळवला आहे. या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांचा जवळजवळ 3733 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. मागील काही दिवसांपासून पंढरपूर पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
यंदा कोरोनाच्या महामारीमुळे कोरोनाचे नियमांचे पालन करीत अतिशय काटेकोरपणे ही मतमोजणी पार पडली. यावेळी तब्बल 38 फेऱ्यांनंतर या निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. दरम्यान, या विजयामुळे भाजपची राज्यातील ताकद आणखी वाढली असल्याचं बोललं जात आहे.
हे वाचलं का?
पंढरपूरच्या अंतिम आकडेवारीनुसार भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी 1 लाख 9 हजार 451 मतं मिळवून विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी देखील तब्बल 1 लाख 5 हजार 717 मतं मिळवली. त्यामुळे अवघ्या 3733 मतांनी समाधान आवताडे हे विजयी झाले आहेत.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेलल्या जागेसाठी लागलेल्या पोटनिवडणुकीकरिता 17 एप्रिलला मतदान पार पडलं होतं. यावेळी येथे मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं. याच निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. ज्यामध्ये भाजपने विजय मिळवला आहे.
ADVERTISEMENT
LIVE UPDATE:
ADVERTISEMENT
-
पहिली फेरी
भाजप: समाधान आवताडे :2844
राष्ट्रवादी: भगीरथ भालके :2494
शैलजा गोडसे: 51
सचिन पाटील: 0
सिद्धेश्वर आवताडे: 10
समाधान अवताडे हे 350 मतांनी पुढे
दुसरी फेरी
राष्ट्रवादी काँग्रेस – 5606
भाजप – 5492
दुसऱ्या फेरीनंतर भगीरथ भालके 114 मतांनी आघाडीवर
तिसरी फेरी
भाजप: समाधान आवताडे : 7978
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 8613
राष्ट्रवादीचे भगीरथ भालके 650 मतानी आघाडीवर
चौथी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 11303
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 11941
शैलजा गोडसे: 196
सचिन पाटील: 215
राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे 638 मतांनी पुढे
पाचवी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 14059
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 14717
शैलजा गोडसे: 243
सचिन पाटील: 228
राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे 658 मतांनी पुढे
सहावी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 17218
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 17412
शैलजा गोडसे: 283
सचिन पाटील: 241
राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके हे 194 मतांनी पुढे
सातवी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 20223
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 19380
भाजपचे समाधान आवताडे हे 833 मतांनी पुढे
आठवी फेरी
भाजप: समाधान आवताडे :23500
राष्ट्रवादी : भगीरथ भालके :21334
भाजपचे समाधान आवताडे हे 2166 मतांनी पुढे
नववी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 26255
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 24027
भाजपचे समाधान आवताडे हे 2228 मतांनी पुढे
दहावी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 28776
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 27133
भाजपचे समाधान आवताडे हे 1643 मतांनी पुढे
अकरावी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 30975
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 29667
भाजपचे समाधान आवताडे हे 1308 मतांनी पुढे
बारावी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 33229
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 32015
भाजपचे समाधान आवताडे हे 1214 मतांनी पुढे
तेरावी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 35893
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 34834
भाजपचे समाधान आवताडे हे 1059 मतांनी पुढे
चौदावी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 38855
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 37842
भाजपचे समाधान आवताडे हे 1013 मतांनी पुढे
पंधरावी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 41933
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 41557
भाजपचे समाधान आवताडे हे 376 मतांनी पुढे
सोळावी फेरी
भाजप: समाधान आवताडे :45934
राष्ट्रवादी: भगीरथ भालके :44707
भाजपचे समाधान आवताडे हे 1227 मतांनी पुढे
सतरावी फेरी
भाजप: समाधान आवताडे :49122
राष्ट्रवादी: भगीरथ भालके :48367
भाजपचे समाधान आवताडे हे 755 मतांनी पुढे
अठरावी फेरी
भाजप: समाधान आवताडे :52450
राष्ट्रवादी: भगीरथ भालके :51384
भाजपचे समाधान आवताडे हे 1066 मतांनी पुढे
-
एकोणवीसावी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 55559
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 54664
भाजपचे समाधान आवताडे हे 895 मतांनी पुढे
-
वीसावी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 58787
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 57046
भाजपचे समाधान आवताडे हे 1741 मतांनी पुढे
-
एकवीसवी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 62056
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 58809
भाजपचे समाधान आवताडे हे 3247 मतांनी पुढे
-
बावीसवी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 64810
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 60864
भाजपचे समाधान आवताडे हे 3946 मतांनी पुढे
-
तेवीसवी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 68602
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 62974
भाजपचे समाधान आवताडे हे 5628 मतांनी पुढे
-
चोवीसवी फेरी
भाजप ; समाधान आवताडे :71584
राष्ट्रवादी : भगीरथ भालके :62528
भाजपचे समाधान आवताडे हे 6056 मतांनी पुढे
-
पंचवीसवी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 75073
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 68739
भाजपचे समाधान आवताडे हे 6334 मतांनी पुढे
-
सव्वीसावी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 77434
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 71112
भाजपचे समाधान आवताडे हे 6317 मतांनी पुढे
-
सत्तावीसवी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 80557
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 73925
भाजपचे समाधान आवताडे हे 6632 मतांनी पुढे
-
अठ्ठावीसवी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 83779
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 76716
भाजपचे समाधान आवताडे हे 7063 मतांनी पुढे
-
एकोणतीसवी फेरी
भाजप ; समाधान आवताडे :86205
राष्ट्रवादी : भगीरथ भालके :80033
भाजपचे समाधान आवताडे हे 6172 मतांनी पुढे
-
तिसावी फेरी
भाजप: समाधान आवताडे :89037
राष्ट्रवादी: भगीरथ भालके :83127
भाजपचे समाधान आवताडे हे 5910 मतांनी पुढे
-
एकत्तीसावी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 91437
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 85479
भाजपचे समाधान आवताडे हे 5958 मतांनी पुढे
-
बत्तीसवी फेरी
भाजप: समाधान आवताडे: 93994
राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 88353
भाजपचे समाधान आवताडे हे 5641 मतांनी पुढे
-
तेत्तीसवी फेरी
भाजप: समाधान आवताडे :96574
राष्ट्रवादी: भगीरथ भालके :91629
भाजपचे समाधान आवताडे हे 4945 मतांनी पुढे
-
चौत्तीसावी फेरी
भाजप: समाधान आवताडे :98445
राष्ट्रवादी: भगीरथ भालके :94299
भाजपचे समाधान आवताडे हे 4136 मतांनी पुढे
-
पस्तीसावी फेरी
भाजप: समाधान आवताडे :101607
राष्ट्रवादी: भगीरथ भालके :97212
भाजपचे समाधान आवताडे हे 4395 मतांनी पुढे
-
छत्तीसावी फेरी
भाजप: समाधान आवताडे 104285
राष्ट्रवादी: भगीरथ भालके :100183
भाजपचे समाधान आवताडे हे 4102 मतांनी पुढे
-
शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये काँटे की टक्कर सुरू
-
भाजपाचे समाधान आवताडे आघाडीवर
-
पहिल्या व दुसऱ्या फेरीत भगीरथ भालके पिछाडीवर
-
पोस्टल मतमोजणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके आघाडीवर
एकाच हॉलमध्ये सोशल डिस्टन्स पालन करून यावेळी 14 वेगवेगळे टेबल मांडण्यात आले असून त्यावर प्रत्येकी 4 कर्मचारी बसणार असून किमान 300 प्रतिनिधी आणि 160 कर्मचारी हे मतमोजणी कक्षात असणार आहेत. यावेळी कोणत्याही कार्यकर्त्याला रस्त्यावर अथवा मतमोजणी केंद्राकडे येता येणार नसून यावेळी लाऊड स्पीकरवरून होणारी अनाउन्समेंट बंद असणार आहे. दर फेरीनंतर निकालाची माहिती येथील पत्रकारांना दिली जाणार असून टीव्ही माध्यमे, रेडिओ अथवा निवडणूक आयोगाच्या अॅपवर निकालाचे अपडेट मिळणार आहेत.
524 मतदान केंद्रावर 2 लाख 34 हजार मतदारांनी केलेले मतदान मशीनद्वारे मोजले जाणार आहे. यावेळी वृद्ध व अपंग मतदारांचे आलेले टपाली मतदान 3289 आहे. तर माजी सैनिकांचे 546 मतदान आहे.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेलल्या जागेसाठी लागलेल्या पोटनिवडणुकीकरिता 17 एप्रिलला मतदान पार पडलं होतं. यावेळी येथे मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं.
दिवंगत आमदार भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले होते. तीन वेगवेगळ्या पक्षातून ते सभागृहात पोहोचले होते. 2009मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव केला होता. त्यामुळे ते पंढरपूरमध्ये जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला होता. विशेष म्हणजे 2019मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खरंतर त्यावेळी ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होती. मात्र ऐनवेळी भारत भालकेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मतदारसंघात रिकामी झालेल्या जागेवर आता कोण निवडून येणार हे आजच्या निकालानंतर कळेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT