पोरासाठी कायपण ! ५ एकरावरची द्राक्षबाग काढून बापाने तयार केलं क्रिकेट ग्राऊंड
आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी प्रत्येक आई-वडील आटोकाट प्रयत्न करत असतात. पंढरपुरातल्या एका द्राक्ष बागायतदाराने आपल्या मुलाच्या क्रिकेट सरावामध्ये खंड पडू नये यासाठी ५ एकरावरची द्राक्षबाग काढून तिकडे क्रिकेटचं मैदान तयार केलं आहे. पंढरपूर तालुक्यातल्या बाळासाहेब सूर्यवंशी यांनी आपल्या मुलासाठी लढवलेली शक्कल सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनते आहे. सूर्यवंशी यांचा मुलगा अभियशला क्रिकेटची आवड […]
ADVERTISEMENT
आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी प्रत्येक आई-वडील आटोकाट प्रयत्न करत असतात. पंढरपुरातल्या एका द्राक्ष बागायतदाराने आपल्या मुलाच्या क्रिकेट सरावामध्ये खंड पडू नये यासाठी ५ एकरावरची द्राक्षबाग काढून तिकडे क्रिकेटचं मैदान तयार केलं आहे. पंढरपूर तालुक्यातल्या बाळासाहेब सूर्यवंशी यांनी आपल्या मुलासाठी लढवलेली शक्कल सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनते आहे.
ADVERTISEMENT
सूर्यवंशी यांचा मुलगा अभियशला क्रिकेटची आवड आहे. गेल्या ४ वर्षांपासून अभियश क्रिकेटचे धडे घेतो आहे. कोल्हापूरच्या पेठ वडगाव येथील शाळेत शिकणारा अभियश स्थानिक क्रिकेट क्लबमध्ये इम्रान पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. परंतू लॉकडाउनमुळे अभियशला घरी परतावं लागलं. पंढरपुरात क्रिकेट सरावासाठी हव्या तशा सुविधा नसल्यामुळे अभियशच्या सरावात खंड पडायला लागला. यानंतर त्याने आपल्या वडीलांकडे क्रिकेटचं पीच बनवून द्या म्हणून हट्ट धरला.
हे वाचलं का?
आपल्या मुलाच्या सरावात खंड पडू नये म्हणून बाळासाहेब सूर्यवंशी यांनी अखेरीस आपली द्राक्षबाग काढायचं ठरवलं. ५ एकराच्या जागेवरची द्राक्षबाग काढून सूर्यवंशींनी क्रिकेटचं मैदान आणि खेळपट्टी बनवायला सुरुवात केली. द्राक्षबाग काढल्यानंतर संपूर्ण रान सूर्यवंशी यांनी अडीच फुट मरुळ मातीने भरुन घेतलं. सध्या कोरोनामुळे काम बंद असल्यामुळे सूर्यवंशींनी सर्व वाहनं मुलासाठी क्रिकेट ग्राऊंड तयार करण्यासाठी लावली.
ADVERTISEMENT
सूर्यवंशी यांनी आपल्या शेतात ४ राष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्ट्या तसेच २ सरावाच्या खेळपट्ट्या आणि २ सिमेंटच्या खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. क्रिकेटच्या मैदानावर असलेलं गवत मुंबईवरुन आणून सूर्यवंशींनी मुलांच्या सरावात कसलीही कसर राहणार नाही याची काळजी घेतली आहे. सध्या मजुरांमार्फत हे गवत मैदानावर लावून ग्राऊंड तयार करण्याचं काम सुरु आहे. एकीकडे लॉकडाउनमुळे अनेक स्पर्धा रद्द होत असताना, खेळाडूंच्या सरावात खंड पडत असताना पंढरपूरातल्या एका शेतकऱ्याने लढवलेली ही शक्कल खरंच कौतुकास्पद आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT