बोलावा विठ्ठल.. पाहावा विठ्ठल!
पंढरपूरमध्ये भरणाऱ्या चार प्रमुख यात्रांपैकी असणाऱ्या माघ यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा आज (12 फेब्रुवारी) पार पडली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा पंढरपूर प्रांताधिकारी गजानन गुरव व मंदिर समितीचे सल्लागार समिती सदस्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते ही पूजा संपन्न झाली. माघ वारी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
पंढरपूरमध्ये भरणाऱ्या चार प्रमुख यात्रांपैकी असणाऱ्या माघ यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा आज (12 फेब्रुवारी) पार पडली.
हे वाचलं का?
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा पंढरपूर प्रांताधिकारी गजानन गुरव व मंदिर समितीचे सल्लागार समिती सदस्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते ही पूजा संपन्न झाली.
ADVERTISEMENT
माघ वारी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
या वारीनिमित्त राज्यातून जळपास 2 ते अडीच लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.
यामुळे पंढरपूरमध्ये सध्या दर्शनासाठीची रांग ही 1 किलोमीटर अंतरावर पोहचली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेण्यास अडचणी येत होत्या. मात्र यावर्षी भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीला बंधाऱ्यातून पाणी सोडल्याने भाविक पवित्र चंद्रभागा नदीत स्नान करण्याचा आनंद घेत असून पुन्हा एकदा पंढरी नगरी हरीनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT