पंढरपूर : अलिशान गाडीतून चंदन तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चंदनाच्या ओल्या लाकडांची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडण्यात पंढरपूर पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलं आहे. वनविभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधवारी रात्री ही कारवाई केली.

ADVERTISEMENT

पोलिसांनी या कारवाईत १३२ किलो ९०० ग्रॅम सुगंधी चंदन आणि चारचाकी वाहन असा १२ लाख ९७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत गेला आहे. वनपाल एस.एस.पत्की, वनरंरक्षक एस.डी.कांबळे यांनी सर्व मालाची पाहणी करुन पंचनामा केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली.

धक्कादायक ! गाडी रस्त्यातून बाजूला घे सांगणाऱ्या पोलिसावर तलवारीने हल्ला

हे वाचलं का?

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर-मोहोळ रोडवरील तीन रस्ता याठिकाणी वाहन तपासणीदरम्यान सिल्व्हर रंगाची इर्टीका कार (एम.एच 42 के 7611) मध्ये पोत्यांमध्ये सुगंधी चंदनाची ओली लाकडे आढळून आली. यामध्ये एकूण चार पोत्यांमध्ये सुगंधी चंदनाची ओली लाकडे होती ज्याचं वजन १३२ किलोच्या घरात होतं. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुद्देमाल ताब्यात घेत आरोपींना अटक केली आहे.

अमरावती : जन्मदात्या पित्याची मुलाने दगडाने ठेचून केली हत्या

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT