Pankaja म्हणाल्या माझे नेते मोदी आणि अमित शाह, आता समोर आली देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. याबाबत आज देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मोदी आणि अमित शाह यांचं नाव घेऊन पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांना डावललं आहे अशी चर्चा रंगली होती. त्याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही पंकजा […]
ADVERTISEMENT
माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. याबाबत आज देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मोदी आणि अमित शाह यांचं नाव घेऊन पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांना डावललं आहे अशी चर्चा रंगली होती. त्याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
तुम्ही पंकजा मुंडे यांचं भाषण ऐकलं का? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ मी पंकजा मुंडे यांचं भाषण ऐकण्याचं काही कारण नाही. पंकजा मुंडे यांच्याबाबतीत सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता मी त्यावर काय भाष्य करू?’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना त्यांच्यासारखंच उत्तर दिलं आहे.
पंकजा मुंडे दोन दिवसांपूर्वी काय म्हणाल्या होत्या?
हे वाचलं का?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंगळवारी मुंबईतील वरळी येथे आपल्या कार्यालयाजवळ अत्यंत आक्रमक अशा स्वरुपाचं भाषण केलं. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवरुन आपल्या नाराजी तर बोलून दाखवलीच पण पक्षातील विरोधकांवर देखील टिकेची तोफ डागली. पण त्यांच्या या सगळ्या भाषणाचा रोख हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्याचं बोललं गेलं. ‘कुणी म्हणतं मला प्रधानमंत्री व्हायचं आहे ते चालतं का? मग मी का म्हणायचं नाही?’ असं म्हणत पंकजा मुंडेंनी यावेळी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांवरच निशाणा साधला.आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत, सात्विक आहोत. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू असंही त्या म्हणाल्या.
आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
ADVERTISEMENT
इम्पेरिकल डाटा संबंधात छगन भुजबळ यांनी भेट घेतली. मराठा आरक्षणावेळी आम्ही डेटा कसा गोळा केला, हे मी त्यांना सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाने तो कसा व्हॅलिड ठरवला, तेही सांगितलं. तुम्ही पुढाकार घ्यावा, एजन्सी नेमाव्या, मी पर्सनली नोट तयार करुन देईन, मी तुमच्या सोबत काम करेन, सत्तारुढ नेत्यांना नेतृत्त्व करावं लागतं. मी पूर्ण करेन, असं फडणवीसांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिले आहेत. आता निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, पण फेब्रुवारीत मेजर निवडणुका येतील. त्यापूर्वी हे करणं आवश्यक आहे, असंही फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT