अलिबाग : पॅरासेलिंग करताना तुटला दोर; मुंबईतील दोन महिला कोसळल्या समु्द्रात, जीवित हानी टळली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनामुळे दोन वर्षांपासून असलेले निर्बंध शिथिल झाल्यानंतर लोक पर्यटनासाठी समुद्रकिनारी गर्दी करताना दिसत असून, अलिबागमध्ये पॅरासेलिंग करताना अपघात घडल्याची घडना घडली आहे. पॅरासेलिंगचा दोर तुटून दोन महिला समुद्रात कोसळल्या. सुदैवाने त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.

ADVERTISEMENT

अलिबाग तालुक्‍यातील वरसोली येथील समुद्रकिनारी पॅरासेलिंग करताना दोर तुटून दोन महिला समुद्रात कोसळल्‍याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या दोन्‍ही महिला बचावल्‍या आहेत. मात्र यामुळे पर्यटकांच्‍या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे वाचलं का?

27 नोव्‍हेंबर रोजी मुंबईतील साकीनाका येथील काहीजण फिरायला अलिबागला आले होते. त्‍यातील सुजाता नारकर व सुरेखा पाणीकर या दोन महिला पॅरासेलिंग करण्‍यासाठी गेल्‍या. पॅरासेलिंग करताना अचानक दोर तुटल्‍याने त्‍या दोघी समुद्राच्या पाण्‍यात कोसळल्‍या.

पाण्यात कोसळल्याने त्‍यांना कोणतीही दुखापत झाली नाही. दोर तुटल्यानंतर बोटीवरील जीवरक्षकांनी तातडीने बचावकार्य करत दोघींनाही सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

या घटनेमुळे समुद्रकिनारी पर्यटनासाठी येणाऱ्या आणि जलक्रीडांचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेबाबतचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या घटनेबद्दल बोलताना पॅरासेलिंग व्यावसायिक संजय पाटील म्हणाले, ‘पर्यटक आणि व्‍यावसायिकांनी सुरक्षेच्‍या सर्व उपाययोजना करणे गरजेचं आहे. आम्‍ही सर्व सुरक्षा व्‍यवस्‍था करत असतो, यापुढेही सर्व काळजी घेतली जाईल.’

गेल्या महिन्यात घडली होती अशीच घटना

नोव्हेंबरमध्ये अशीच घटना अजित काथड आणि त्यांची पत्नी सरला यांच्यासोबत घडली होती. मात्र, ती गुजरातमधील उना किनारपट्टीवर घडली होती. पॅरासेलिंग करत असताना काही मिनिटांतच त्यांच्या पॅराशूटची पॉवरबोटला बांधलेली दोरी तुटली होती.

त्यानंतर हे जोडपे थेट समुद्रात पडलं होतं. सुदैवाने अजित व त्यांची पत्नी सरला यांनी लाइफ जॅकेट घातलेलं होतं. त्यामुळे त्यांना दुखापत झाली नाही आणि त्यांना समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांनी सुखरुप बाहेर काढलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT