SRK on Pathaan : “मी वैतागलो होतो… इंडस्ट्री सोडून व्यवसाय करणार होतो”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Pathaan press conference Highlights :

ADVERTISEMENT

मुंबई : शाहरुख खानने दमदार कमबॅक केलेला चित्रपट ‘पठाण’ रोज नवा इतिहास रचत आहे. पठाण सध्या देशभरात तुफानी वेगाने कमाई करत आहे. रिलीजच्या पाचव्या दिवशी (रविवारी) पठाणनं देशभरातून ८० कोटींची कमाई केली होती. तर आतापर्यत जगभरातून ५५० कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पठाण केवळ भारतातच नाही तर जगभरातून गाजलेला चित्रपट ठरला असल्याचं सांगितलं जात आहे. (After Pathaan’s huge success, Shah Rukh Khan addressed to the media today)

दरम्यान, पठाण चित्रपटावरुन झालेल्या मोठ्या वादानंतर आणि मिळालेल्या यशानंतर किंगखान शाहरुखने सोमवारी एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील भावना चाहत्यांसोबत शेअर केल्या. शाहरुख खानसोबत जॉन अब्राहम, दीपिका पदूकोण, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि सोबत पठाणची संपूर्ण टीम हजर होती. यावेळी बोलताना शाहरुख भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. चार वर्ष सिनेमे फ्लॉप गेल्याने आपण खूपच वैतागलो होतो, असं सांगतं आपण चित्रपटसृष्टी सोडून नवीन व्यवसायही सुरु करणार होतो असं तो म्हणाला.

हे वाचलं का?

यावेळी बोलताना शाहरुख खान म्हणाला,”माझे याआधीचे सिनेमे फ्लॉप झाले होते. मागील ४ वर्ष माझी खूप वेगळ्या अवस्थेतून गेलेली. मी वैतागलो होतो. एकावेळ अशी आली मी आता इंडस्ट्री सोडण्याचा विचार करतो. मी या काळात जेवण बनवायला शिकलो. मी फूड बिझनेसही सुरु करण्याच्या विचारात होतो. “Red chilies food Italy..” असं त्याचं नाव ठेवणार होतो. पण जर हा सिनेमाही फ्लॉप झाला असता तरी मला लोकांचं तेवढंच प्रेम मिळालं असतं. मी नशीबवान आहे. मला जेव्हा सुखं वाटत किंवा दुःख होत तेव्हा मी बाल्कनीत येतो. मला देवाने आयुष्यभराचं बाल्कनीचं तिकीट दिलं आहे, अशा भावना त्यानं व्यक्त केल्या.

ADVERTISEMENT

जेव्हा आपण चित्रपट बनवतो तेव्हा प्रेम, दयाळूपणा हाच त्याचा उद्देश असतो. जरी आपण चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिका साकारत असू तरीही कोणच्याही भावना दुखावणं हा त्यामागील हेतू नसतो. मजा असो की करमणूक ती तिथेच सोडली पाहिजे. त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नसते. आपण एकमेकांवर प्रेम करतो आणि आपल्याला प्रेमचं पसरवायचं आहे.

ADVERTISEMENT

दीपिका अमर आहे, मी अकबर आहे, जॉन अँथनी आहे. आम्ही सिनेमाचे अमर अकबर अँथनी आहोत. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो, म्हणूनच आम्ही चित्रपट बनवतो. याहुन वेगळं काहीच नाही. आम्ही फक्त तरुणांती भाषा बोलतो, त्यांना जे हवं आहे ते देण्याचं प्रयत्न करतो, असंही शाहरुख खान म्हणाला.

शाहरुख खानने यावेळी दीपिका आणि जॉन अॅब्राहम या सहकलाकारांंचं तोंडभरुन कौतुक केलं. तो म्हणाला, “जॉनची बॉडी बघून मलाही बॉडी करायची इच्छा होती. जॉननेही मला वर्क आऊट करायला शिकवला. पण जॉन ऍक्शन सीन करताना खूप काळजी घेतो. आपल्यामुळे दुसऱ्याला लागणार नाही ना? याची काळजी जॉन घेतो. ऍक्शन करताना जॉन अनेक रिहर्सल करतो” असंही तो म्हणाला. यावेळी जॉन शाहरुखबद्दल म्हणाला,”शाहरुख खान हा अभिनेता नाही तर ती एक भावना आहे”.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT