कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून राज्य सावरतंय, पण…जाणून घ्या आजची आकडेवारी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात परिस्थिती आता हळुहळु नियंत्रणात येत असल्याचं चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येपेक्षा कोरोनावर मात करुन घरी परतणाऱ्या रुग्णांची आकडेवारी जास्त आहे. हाच ट्रेंट आजही कायम राहिला आहे. राज्यात आज २६ हजार ६७२ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून २९ हजार १७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात परिस्थिती आता हळुहळु नियंत्रणात येत असल्याचं चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येपेक्षा कोरोनावर मात करुन घरी परतणाऱ्या रुग्णांची आकडेवारी जास्त आहे. हाच ट्रेंट आजही कायम राहिला आहे. राज्यात आज २६ हजार ६७२ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून २९ हजार १७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
ADVERTISEMENT
आतापर्यंत राज्यात कोरोनावर मात करुन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ही ५१ लाख ४० हजार २७२ एवढी झालेली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही किंचीतशी वाढ झाली असून ही आकडेवारी आता ९२.१२ टक्क्यांवर पोहचली आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases – 26,672
*⃣Recoveries – 29,177
*⃣Deaths – 594
*⃣Active Cases -3,48,395
*⃣Total Cases till date – 55,79,897
*⃣Total Recoveries till date – 51,40,272
*⃣Total Deaths till date – 88,620
*⃣Total tests till date – 3,30,13,516— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) May 23, 2021
आज राज्यात ५९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून राज्याचा सध्याचा मृत्यूदर हा १.५९ टक्के इतका आहे. एकीकडे राज्याची अशी परिस्थिती असताना मुंबई महानगपालिका क्षेत्रातही हाच ट्रेंड बघायला मिळाला.
हे वाचलं का?
#CoronavirusUpdates
२३ मे, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – १४३१
२४ तासात बरे झालेले रुग्ण – १४७०
बरे झालेले एकूण रुग्ण – ६५२६८६
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९३ %एकूण सक्रिय रुग्ण- २८४१०
दुप्पटीचा दर- ३३१ दिवस
कोविड वाढीचा दर ( १६ मे ते २२ मे)- ०.२० % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 23, 2021
मुंबईत ४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रुग्णसंख्येची साखळी मोडण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन या उपक्रमाअंतर्गत राज्यात लॉकडाउन आणि इतर निर्बंध घातले. आजही अनेक भागांमध्ये कडक लॉकडाउनची घोषणा करण्यात येत आहे. याच निर्बंधांमुळे रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात सरकारला यश येताना दिसत आहे. त्यामुळे यापुढेही लॉकडाउनच्या नियमांचं असचं पालन झालं तर दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश येईल असं चित्र सध्या आकडेवारीवरुन स्पष्ट होतंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT