किर्ती मोटे हत्याकांड : अभिनेत्रीची मन सुन्न करणारी पोस्ट! ‘आई तू आमच्या मागे ठाम होतीस म्हणून…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथील किर्ती मोटे-थोरे हिच्या हत्याकांडाने अवघा महाराष्ट्र हादरुन गेला आहे. ऑनर किलिंगची ही घटना एवढी भयंकर होती की, त्यातून पीडित कुटुंबीय अद्यापही सावरु शकलेले नाहीत. या घटनेचे पडसाद आता समाजमाध्यमांवरही पडू लागलेत. अनेक लोकांनी या क्रूर घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह केल्याची मोठी किंमत मुलींना मोजावी लागतेय. या क्रूर घटनेवर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील अभिनेत्री मीनाक्षी राठोडने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये या घटनेबद्दल समाजातील एक जळजळीत वास्तव सर्वांसमोर मांडलं आहे.

ADVERTISEMENT

मीनाक्षी या पोस्टमध्ये म्हणते की

आई…

हे वाचलं का?

1)मोठ्या ताईचं intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी खूप त्रास दिला तुला. मी पाहिलंय. किती राग आला असेल न तुला ताई चा.

2) माझं कैलाश सोबत intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी जवळ जवळ तुला त्यांच्यात गृहीत धरणं सोडलं होतं. किती किती राग आला असेल तुला माझा!

ADVERTISEMENT

पण कायम उसाचे पाचड अंगाखांद्यावर बाळगणारा तांडा आणि पुढारल्या पणाचे सोंग मिरवणारी आपली शहरातली कॉलनीही तुझ्या एका स्वीकाराने तुझ्या सोबत ऊभी राहीली!

ADVERTISEMENT

3) काल परवा आपल्या लहान मुलीचं ही intercaste लग्नं मोठ्या थाटात लावून दिलस. आणि सगळ्यांनाच जणू हीच कशी नवीन जन रीत आहे हे सांगून दिलेस! हे स्विकाराचंं बीज तुला कुठे गवसलं?

अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक…; ‘सैराट’ त्यांच्या आयुष्यातच घडला!

आपल्याला 5 मुली असतांना सुद्धा एवढं कसं तू स्वतःला सांभाळलस.! राग कसा ग control केलास? ते ही पप्पा नसतांना ,तुला नाई का ग आम्हाला मारून टाकावस वाटलं?

हे असच “कीर्ती थोरे “च्या आईला का नाई वाटलं एवढं राग अनावर होत असतो का प्रतिष्ठे पाई? तिने तर जातितच लग्न केले होते. तुझ्या एवढं नाई फक्त एकाच मुलीला स्वीकारायचं होते तिला. पोटच्या मुलीचा इतक्या अमानुषपणे खून करावसं वाटणं या पेक्षा क्रूर काय असू शकतं या जगात. काश माझ्या सारखी आई कीर्ती ला लाभली असती तर? आणि हो! स्वप्निल शुभम सारखे भाऊ ही!

या बेगडी प्रतिष्ठेच्या बंजर जमिनीवर तुझ्या स्विकाराचंं बियाणं सापडूदे आई!

काल परवाच सकारात्म वाटणारी तुझ्या वाढदिवशी लिहिलेली ही पोस्ट, आज ही घटना एकूण अस्वस्थ करणारी आहे.

सगळ्या चिंता, रुढी परंपरांना झुगारून हा जो swag तू स्वीकारला आहेस याने तुझ्या लेकरांची आयुष्य सुखी झाले आहेत. तुझ्यातल्या या सकारात्मक बदलाने आजूबाजूची परिस्थिती कुस बदलतेय! हा swag खर्या अर्थाने तुलाच शोभून दिसतो! जो प्रत्येक स्त्री मधे येवो!

मीनाक्षी राठोडचा नवरा कैलास वाघमारेही एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचं आणि मीनाक्षीचं लग्नही इंटरकास्ट झालं आहे. मात्र मीनाक्षीच्या म्हणण्यानुसार तिच्या आईने कधीच या गोष्टीबद्दल विरोध केला नाही. मात्र समाजात घडत असलेल्या या क्रूर घटना मन सुन्न करून टाकतात

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT