पीएचडीच्या विद्यार्थिनींचा मानसिक छळ; अपमानास्पद वागणूक, पैशांची मागणी केल्याचा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील हिंदी विभागातील एका प्राध्यापकावर दोन विद्यार्थिनींचा मानसिक आणि आर्थिक दृष्टीने छळ केल्याचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या विद्यार्थिनीने विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

पीएचडी साठी संशोधन आणि विषयाचा आराखडा सादर करण्यासाठी हिंदी विभागाच्या प्राध्यापकाने आपल्याला अपमानास्पदरित्या वागणूक देत मानसिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून छळ केल्याचा पीडित विद्यार्थिनींचा आरोप आहे. आपला आराखडा रितसर सादर केल्यानंतरही या प्राध्यापकाने आपल्याकडे पैशांची मागणी केल्याचं या मुलींनी तक्रारीत म्हटलं आहे.

७ मार्च रोजी या प्रकरणात कुलगुरुंकडे याप्रकरणी रितसर तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतू अद्याप या विषयावर कारवाई झालेली नाही. नागपूर विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विष्णू चांगदे यांनी सिनेटमध्ये हा मुद्दा उपस्थित करत अशा प्रकारची तक्रार विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. अभय मुदगल यांच्याकडे देण्यात आली असल्याचे सांगितले.

हे वाचलं का?

कुलगुरुंकडे तक्रार दाखल करण्यात येऊन आठवडा उलटून गेल्यानंतर विद्यार्थिनींचा खळ करणाऱ्या प्राध्यापकावर कारवाई झालेली नसल्यामुळे विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT