एकटेच संन्यास घेणार की मोदींना घेऊन? रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना सवाल
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन रस्त्यावर उतरलेल्या भाजपला आता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनीही जशास तसं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न माझ्या हातात द्या, ४ महिन्यात आरक्षण मिळवून देतो नाहीतर राजकीय संन्यास घेईन अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. संन्यास घेतील तुमचे दुष्मन ! […]
ADVERTISEMENT
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन रस्त्यावर उतरलेल्या भाजपला आता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनीही जशास तसं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न माझ्या हातात द्या, ४ महिन्यात आरक्षण मिळवून देतो नाहीतर राजकीय संन्यास घेईन अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
संन्यास घेतील तुमचे दुष्मन ! शिवसेनेच्या देवेंद्र फडणवीसांना कोपरखळ्या
फडणवीस एकटेच राजकीय संन्यास घेणार आहेत की मोदीजींनाही सोबत नेणार आहेत? OBC आरक्षणाचा बळी देण्यात दोघांचाही मोलाचा वाटा आहे. लबाड लांडगा ढोंग करतंय, ओबीसींचे नाव घेऊन मी पुन्हा येईन चं सोंग करतंय असं म्हणत चाकणकरांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
हे वाचलं का?
फडणवीस एकटेच संन्यास घेणार आहेत की मोदीजींना ही सोबत नेणार आहेत? ओबीसी आरक्षणाचा बळी देण्यात दोघांचा वाटा आहे म्हणून विचारलं.
लबाड लांडगा ढोंग करतंय,
ओबीसींचे नाव घेऊन मी पुन्हा येईन च सोंग करतंय….— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 27, 2021
रुपाली चाकणकरांनी फडणवीसांवर टीका केलेली असताना काल त्यांच्या जुन्या सहकारी आणि सध्या भाजपत असलेल्या चित्रा वाघ यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली होती. ‘ताची राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांच्या विचाराची राहिलेली नाही. जनतेच्या प्रश्नापासून पळ काढण्यासाठी सरकार दोन दिवसांचे अधिवेशन घेत आहे. जर पूर्ण वेळ अधिवेशन घेतले तर भाजप यांना फाडून खाईल, याची भीती वाटत आहे. त्यामुळेच सरकार असे वागत आहे.’
शनिवारी राज्यात भाजपने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चक्काजाम आंदोलन केलं होतं. या आंदोलनात देवेंद्र फडणवीसांनी ४ महिन्यात आरक्षणाचा प्रश्न सोडवतो नाहीतर राजकीय संन्यास घेतो अशी घोषणा केली होती.
ADVERTISEMENT
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. आमच्या हाती या आरक्षणाची सूत्रं द्या, चार महिन्यात हा प्रश्न सोडवला नाही तर राजकीय संन्यास घेईन असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी चक्काजाम आंदोलनात केलं होतं. सरकार मधील तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात भांडतात. सत्तेचे लचके तोडतात, मात्र केंद्र सरकार ला दोष देताना एक होतात असाही आरोप फडणवीस यांनी केला. एवढंच नाही तर उद्या यांना यांच्या बायकोने मारले तरीही ते मोदींनाच दोष देतील असा खोचक टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
ADVERTISEMENT
OBC Reservation : प्रश्न कसा सोडवाल ते सांगा सत्तेत येण्याची गरज नाही – जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT