PM Modi-CM Thackeray: 20 मिनिटांच्या भेटीत बंद दाराआड नेमकी काय चर्चा?, संजय राऊतांनी दिली Exclusive माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज (8 जून) शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांची भेट घेतली. यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर जवळजवळ दीड तासांहून अधिक काळ या शिष्टमंडळाशी पंतप्रधानांनी चर्चा केली. मात्र, त्यानंतर तब्बल 20 मिनिटं पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.

ADVERTISEMENT

आता याच बंद दाराआडच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या चर्चेत नेमकं काय घडलं असेल? हे जाणून घेण्यासाठी ‘मुंबई तक’ने शिवसेनेचे (Shiv Sena) फायरब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची एक विशेष मुलाखत घेतली. ज्यामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांची थेट उत्तरं दिलं आहेत.

प्रश्न: 20 मिनिटांच्या चर्चेत नक्की काय झालं?

हे वाचलं का?

संजय राऊत: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा दुसऱ्या कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेणं यात खळबळ माजण्यासारखं काय आहे? केंद्र आणि राज्य यांचे संबंध आणि संवाद हे उत्तम असावेत. हा संवाद उत्तम असल्याशिवाय राज्य गती घेऊ शकत नाही विकासकामाच्या बाबतीत.

राज्य अनेक बाबतीत केंद्रावर अवलंबून असतं. महाराष्ट्राच्या बाबतीत काही प्रमुख प्रश्न घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण हे पंतप्रधानाच्या भेटीला गेले होते. मी तर असं म्हणेन की, प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ममता बॅनर्जींसह राज्याच्या प्रश्नासंबंधी कोणताही संघर्ष आपल्याकडून करु नये.

ADVERTISEMENT

त्यांनी पंतप्रधान आणि देशाच्या अर्थमंत्र्यांशी उत्तम संवाद ठेवला तर अनेक प्रश्न मार्गी लागतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फालतू संघर्षात पडत नाहीत. ते संयमी आहेत. ते चर्चेतून अनेक विषय सोडविण्याचा प्रयत्न करत असतात.

ADVERTISEMENT

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नव्हते तेव्हापासून त्यांचे शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राजकारणात मार्ग बदलले तरीही अशाप्रकारचे संबंध टिकवून ठेवण्याची संस्कृती महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये आहे.

आता शरद पवार आणि शिवसेना यांच्यात अनेक वर्ष उभा दावा होता राजकारणात. तरी आमचे संबंध टिकून राहिले. हे संबंध टिकवणं आणि ते संबंध सुमधूर करणं हे चांगल्या मानसिकतेचं लक्षण आहे. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे हे २० मिनिटं बंद दाराआड भेटले असतील.

यावेळी त्यांनी सुखदु:खाच्या, भावनेच्या गोष्टी केल्या असतील. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारणच आहे आणि उद्धव ठाकरे मुंबईत आल्यानंतर ताबडतोब राजकारणात उलथापालथ होईल हा भ्रम आहे.

Udayanraje Bhosale: मुख्यमंत्री ठाकरेंची PM मोदींशी भेट म्हणजे राजकीय तडजोडच, परत सत्तांतर होणार: उदयनराजे

प्रश्न: दोघांच्या भेटीत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांबाबत पतंप्रधानांकडे तक्रार केली आहे का?

संजय राऊत: नक्कीच.. राज्यपाल हे थेट केंद्राचे प्रतिनिधी आहेत. राज्यपाल हे महाराष्ट्रात काही चुकीचं करत असतील असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर नक्कीच मुख्यमंत्री त्यांची तक्रार पंतप्रधानांकडेच करणार. त्यानुसार त्यांना ती संधी मिळाली आणि त्यांनी ती केली असणार.

कॅबिनेटने घेतलेला निर्णय आणि शिफारसी राज्यपालांना पाठविल्या असतील तर त्यावर निर्णय घेणं हे राज्यपालांचं कर्तव्य आहे. यामागे राज्यपालांचा असा कोणता गहन अभ्यास चाललेला आहे? याबाबत मुख्यमंत्री नक्कीच पंतप्रधानांशी चर्चा करु शकतात.

प्रश्न: महाराष्ट्रातील विरोधकांबाबत (भाजप) मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींना नेमकं काय काही सांगितलं असेल का?

संजय राऊत: सध्या राज्यावर, देशावर जी संकटं येत आहेत अशावेळी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. आता मराठा आरक्षणाचा विषय हा नक्कीच गंभीर आहे. त्यासंबंधी सरकारने निर्णय घेणं गरजेचं आहे.

मराठा समाजाविषयी आम्हा सर्वांना सहानभूती आहे. त्याबाबत निर्णय होणं गरजेचं आहे. पण केंद्राकडे आम्ही पाठपुरावा करत असताना भाजपमधील किंवा इतर संघटनेतील नेते ज्या प्रकारे मोर्चे काढणं, आंदोलनाची धमकी देणं, इशारे देणं त्यात भाजपच्या लोकांनी सहभागी होणं यामुळे महाराष्ट्रात आपण कोरोनाची लाट थांबविण्याचा जो प्रयत्न करत आहोत त्याला परत गती मिळते.

अशाप्रकारचं मतं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे मांडलं असेल तर त्यात काही चुकतं आहे असं मला वाटत नाही.

Uddhav Thackeray आणि मोदी भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच – संजय राऊत

प्रश्न: आजच्या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस यांचा समावेश का करण्यात आला नाही? असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत: दरेकरांचा आक्षेप मी समजू शकतो. पण जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांनी राज्य सरकार म्हणून पंतप्रधानांची वेळ मागितली होती. राज्य सरकारचा भाग म्हणून त्यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना नेलं.

मराठा आरक्षणाच्या विषयावर त्यांनी चर्चा केली आहे. महाराष्ट्रात यावर वारंवार चर्चा झाली आहे आणि त्यात फडणवीस सहभागी होते. केंद्रामध्ये हा विषय नेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री गेले आहेत. नक्कीच स्वतंत्रपणे जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचा पाठलाग केला पाहिजे.

प्रश्न: बारा आमदारांच्या नियुक्तीसाठी पंतप्रधानांकडे साकडं घालणं हे विचित्र आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत, तुमचं काय मत आहे याबाबत?

संजय राऊत: आमचं म्हणणं असं आहे की, राज्यपालच विचित्र वागत आहेत. विचित्र वागणाऱ्या राज्यपालांची तक्रार ही कुठे करायची मला सांगा? ही तक्रार, पंतप्रधान, गृहमंत्री किंवा राष्ट्रपती यांच्याकडेच करावी लागेल. त्यानुसार आपल्या मुख्यमंत्र्यांनी ही तक्रार केली असेल तर त्यामध्ये विरोधी पक्षाने काही आक्षेप घ्यावा असं मला वाटत नाही.

Pm मोदींच्या भेटीनंतर भाजप शिवसेनेत जवळीक वाढेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

प्रश्न: पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याशी चांगले संबंध ठेवायचे पण राज्यातील भाजप नेत्यांविरोधात आघाडी उघडायची असं शिवसेनेचं राजकारण दिसतं आहे.

संजय राऊत: मला तसं वाटत नाही. सरकार पक्षाकडून उगाचच विरोधी पक्षावर हल्ले करण्याचा काही प्रयत्न नाही. हल्ले विरोधी पक्षाकडून केला जात आहे. सरकार का विरोधी पक्षावर हल्ला करेल ना? विरोधी पक्षाकडून हल्ला झाल्यानंतर शिवसेना किंवा सरकारमधील मंत्री त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतात.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात संबंध कालही चांगले होते आणि आजही चांगले आहेत. जसं काल चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, आमचा अजित पवारांवर राग नाही पण शिवसेनेवर आमचा प्रचंड राग आहे. आता अशाप्रकारची वक्तव्य ते करत राहणार.

आम्ही समजू शकतो ते सत्ता स्थापन करु शकले नाहीत त्यांच्याकडे १०५ आमदार होते. तरीही त्यांना सरकार स्थापन करण्यात अपयश आलं. अजित पवार यांच्यासारखा मोहरा गळाला लागून सुद्धा त्यांचं बहुमत होऊ शकलं नाही. ही त्यांची मानसिकता आमची समजून आहोत. त्यामुळे आम्ही उठसूट त्यांच्यावर पलटवार करत नाही.

प्रश्न: केंद्र महाराष्ट्राची कोंडी करतं असा आरोप राज्य सरकारकडून केला जात होता.

संजय राऊत: केंद्राच्या भूमिकांमुळे काही प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्याविषयी मुख्यमंत्री पंतप्रधानांना सांगत असतील तर राज्याच्या विरोधी पक्षाने या मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांचा जाहीर सत्कार केला पाहिजे.

इतर राज्यात जो केंद्रासोबत संघर्ष सुरु आहे दररोज तो न करता अत्यंत समंजसपणे ते पंतप्रधानांना भेटतायेत आणि राज्याची भूमिका माडंत आहेत याविषयी कुणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही.

PM Modi आणि CM Thackeray यांच्या भेटीतील 10 महत्त्वाचे मुद्दे

प्रश्न: २०१९ साली बंद खोलीतील बैठकीनंतर जे महाराष्ट्राचं राजकारण बदलून गेलं तशी काही अपेक्षा आता ठेवायची की नाही?

संजय राऊत: मी तुम्हाला अगदी खात्रीने आणि ठामपणे सांगतो की, हे सगळे भ्रम निर्माण केले जात आहेत हे चुकीचे आहेत. उद्धव ठाकरे यांनी महिन्यातून एकदा तरी पंतप्रधान मोदींची भेट घ्यावी अशा मताचा आहे मी. त्यांनी दिल्लीत जाऊन संवाद वाढविला पाहिजे आणि राज्याचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे आणि केंद्रापुढे नम्रपणे वाकायला आम्हाला काही वाटत नाही.

हा राज्याचा प्रश्न आहे. पंतप्रधान हे देशाचं आहे. त्यामुळे या भेटीतून राज्यात काही बदल होईल किंवा सरकार बदल होईल तर तसं काही नाही. संपूर्ण उरलेला साडेतीन वर्षाचा कालावधी आहे त्यात महाविकास आघाडीचं सरकार राहिल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच राहतील. त्यात थोडाही बदल होणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT