PM मोदींनी घेतले मोठ्या भावाचे आशीर्वाद : सोमाभाईंनी भावनिक होतं दिला विश्रांतीचा सल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अहमदाबाद : गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील ९३ जागांवर आज मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज अहमदाबादमधील रानिप येथील निशान पब्लिक स्कूलमधील बूथवर मतदान केलं. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जवळच राहतं असलेल्या सोमाभाई या त्यांच्या मोठ्या भावाची चालत जाऊन भेट घेतली.

ADVERTISEMENT

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सोमाभाईंनी सांगितले, मी पंतप्रधानांना थोडा आरामाचा सल्ला दिला. ते देशासाठी खूप काम करत आहेत. त्यामुळे त्यांनीही थोडी विश्रांती घ्यावी, असं मी त्यांना सांगितलं, असंही ते म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदींचा उल्लेख करताच सोमाभाई काहीसं भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं.

तसंच यावेळी सोमाभाई यांनी जनतेला मतदान करण्याचंही आवाहन केलं. ते म्हणाले, जनतेनं मतदानाच्या हक्काचा योग्य प्रकारे वापर करावा. लोकांनी अशा पक्षाला मतदान करावं, जो पक्ष देशाची प्रगती करु शकेल. तसंच सोमाभाई पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी कठोर परिश्रम करत असल्याचं आपण सर्वजण पाहत आहोत. केंद्र सरकारने 2014 पासून केलेली कामे कोणीही नाकारू शकत नाही. गुजरातमधील जनता त्याच आधारावर मतदान करत आहे.

हे वाचलं का?

पंतप्रधान मोदींच्या आईंनी केलं मतदान :

दरम्यान, आज पंतप्रधान मोदींच्या आई हिरा बेन यांनीही गांधीनगरमध्ये मतदान केलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा पंकज मोदी आणि त्यांचे कुटुंबही होते. हिराबेन यांचं वय आता 100 वर्षांच्या आसपास आहे. पंतप्रधान मोदींनीही निशान पब्लिक स्कूलमध्ये मतदान केले. यावेळी सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभं राहून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी दिल्ली, गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या लोकांचे आभार मानले. ते म्हणाले, या तिन्ही ठिकाणच्या नागरिकांनी लोकशाहीच्या या उत्सवात उत्साहाने सहभाग घेतला. निवडणुका शांततेत पार पाडण्याऱ्या निवडणूक आयोगाचेही त्यांनी अभिनंदन केलं. यावेळी पंतप्रधान मोदींना पाहण्यासाठी सकाळपासूनच लोकांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT