पंतप्रधान मोदींनी लता मंगेशकरांना केलं अभिवादन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असताना लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दाखल झाले. त्यांनी लता मंगेशकरांचं अंत्यदर्शन घेतलं.

ADVERTISEMENT

लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर ते शिवाजी पार्क येथे आले. शिवाजी पार्क येथे लता मंगेशकरांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कवर अंत्यसंस्काराची सर्व तयारी करण्यात आली आहे. लतादीदींचं पार्थिव शिवाजी पार्क येथे आणण्यात आलं असून, याचं ठिकाणी त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे.

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं होतं.

ADVERTISEMENT

३६ भाषांमध्ये हजारो गाणी गायलेल्या लतादीदींचे देशभरात कोट्यवधी चाहते आहेत. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रात न भरुन येणारी पोकळी तयार झालं असल्याचं मोदी म्हणाले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT