Tauktae Cyclone पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून चर्चा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Tauktae चक्रीवादळाने महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. मुंबईच्या किनाऱ्यापासून 125 किमी अंतरावर वादळ घोंगावतं आहे. ज्याचा परिणाम मुंबईवर पाहण्यास मिळतो आहे.एवढंच नाही तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांनाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. रविवार संध्याकाळ ते सोमवार सकळापर्यंत अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तर मुंबईत अनेक भागांमध्ये पाऊस कोसळतो आहे. मुंबईतला सागरी सेतूही बंद ठेवण्यात आला आहे. या सगळ्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती घेतली.

ADVERTISEMENT

पुढील काही तासांमध्ये मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यांचा वेगही वाढणार आहे. मुंबईत काही तासांमध्ये ताशी 120 किमी या गतीने वारे वाहण्याचा अंदाज आहे. आज दुपारी ही गती 80 ते 90 किमी प्रति तास इतकी होती.

महाराष्ट्राला (Maharashtra) सध्या कोरोनासोबतच (Corona) ‘तौकताई’ या चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) देखील सामना करावा लागतो आहे. अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाच्या पट्टा तयार झाल्याने या वादळाची निर्मिती झाली आहे. (Cyclone) कालपासून (16 मे) हे वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात घोंघावत आहे. त्यामुळे या वादळाचा बराच फटका गोव्यासह कोकण किनारपट्टी भागाला बसला आहे. सध्या या वादळाने मुंबईत एंट्री केली असून आता ते पालघर-डहाणूमार्गे थेट गुजरातमध्ये जाऊन धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

तौकताई हे वादळ आज (17 मे) सकाळी 7 वाजेच्या सुमारास मुंबईपासून आत 150 किमी खोल समुद्रात पोहचलं आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच तुफान वेगाने वारा देखील वाहत आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा (Nisarga Cyclone) लँडिंग पॉईंट हा रायगड जिल्ह्यातच होता. त्यामुळे येथे प्रचंड नुकसान झालं होतं. या नुकसानात येथील नागरिक अद्याप सावरलेले देखील नाहीत तोच आता तौकताई चक्रीवादळाचा त्यांना फटका बसला आहे

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT