मला मारण्याची धमकी पोलीस देत आहेत, वाट अडवली-Nitesh Rane

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पोलीस मला धमकी देऊन मारण्याची भाषा करत आहेत अशी प्रतिक्रिया भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. मी माझ्या पद्धतीने रत्नागिरीच्या दिशेने जात होतो, माझ्यासोबत काही सामान्य नागरीकही आहेत. मात्र पोलीस आम्हाला कुठेही जाऊ देत नाहीत. त्यांनी आम्हाला अडवून ठेवलंय. काही लोकांना चिपळूणमध्ये काही लोकांना रत्नागिरीत काम आहे मात्र त्यांची वाट अडवण्यात आली आहे. मला मारण्याचीही भाषा या ठिकाणी पोलिसांनी केली असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यावरून आज राज्यभरात ठिकठिकाणी भाजप विरूद्ध शिवसेना असा राडा पाहण्यास मिळतो आहे. आता रत्नागिरीमध्ये जाण्यापासून आमदार नितेश राणेंना अडवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी त्याबाबत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तसंच पोलिसांनी आपल्याला मारहाण करण्याची धमकी दिल्याचं म्हटलं आहे.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

हे वाचलं का?

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक मुद्यांवरुन टीका केली. सुरुवातीला नारायण राणेंनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन यावरुन बरीच मुख्यमंत्र्यांवर बरीच टीका केली.

‘या माणसाकडे कोणातीही उपाययोजना नाही. काही झालं की, लॉकडाउनची भीती दाखवली जाते. महाराष्ट्रात आज व्यापाऱ्यांची हालत गंभीर आहे. आर्थिक फटका बसल्यामुळे ते 10 वर्ष माना वर काढू शकत नाही. आरोग्य विभागाची अवस्था भयावह आहे. स्टाफ नाही, डॉक्टर नाही, लस नाही अशी गंभीर परिस्थिती राज्यात आहे.’ असं म्हणत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.

ADVERTISEMENT

त्यानंतर पुढे ते असं म्हणाले की, ‘या मुख्यमंत्र्यांना देशाचा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव हेच माहिती नाही. 15 ऑगस्टला राज्यातील जनतेला उद्देशून भाषण करत असताना उद्धव ठाकरे मागे उभे असलेल्या मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना विचारतात हिरक महोत्सव आहे ना? मी त्या जागी असतो तर कानाखाली चढवली असती. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी हे किती चीड आणणारी गोष्ट आहे.’ असं वक्तव्य राणेंनी महाडमध्ये केले होतं.

ADVERTISEMENT


ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT