परबांचं कथित रिसॉर्ट, सोमय्यांचा हातोडा ते अटक, जाणून घ्या दापोलीत काय-काय घडलं?
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील कथित रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेऊन गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्यांना अखेरीस पोलिसांनी अटक करुन पुन्हा रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर पोहचवण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल परबांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून बसणाऱ्या सोमय्यांच्या झंजावाती आंदोलनाची अखेर त्यांच्या अटकेने झाली. किरीट सोमय्यांसोबत यावेळी त्यांचा मुलगा नील सोमय्या, […]
ADVERTISEMENT
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील कथित रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेऊन गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्यांना अखेरीस पोलिसांनी अटक करुन पुन्हा रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर पोहचवण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल परबांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून बसणाऱ्या सोमय्यांच्या झंजावाती आंदोलनाची अखेर त्यांच्या अटकेने झाली.
ADVERTISEMENT
किरीट सोमय्यांसोबत यावेळी त्यांचा मुलगा नील सोमय्या, भाजप नेते निलेश राणे उपस्थित होते. यावेळी भाजप नेते-कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलाच संघर्ष झालेला पहायला मिळाला. जाणून घेऊयात आजच्या दिवशी काय काय झालं?
पोलीस अधिक्षकांनाच कायदा-सुव्यवस्था बिघडवायची आहे – दापोलीत निलेश राणेंचा गंभीर आरोप
हे वाचलं का?
१) प्रतिकात्मक हातोडा घेऊन सोमय्या मुंबईतील घरातून निघाले –
दापोलीतील अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टवर कारवाईसाठी जाणार असल्याचं सोमय्यांनी ट्विटरवर जाहीर केलं होतं. यासाठी ते आपल्या कार्यकर्त्यांसह हातात प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीच्या दिशेने रवाना झाले.
ADVERTISEMENT
आम्हाला अडवणं ठाकरेंना बापजन्मात जमणार नाही – निलेश राणेंनी शिवसेनेला डिवचलं
ADVERTISEMENT
२) महाविकास आघाडीकडून सोमय्यांच्या दौऱ्याला विरोध –
किरीट सोमय्या दापोलीत येणार असं समजताच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी त्यांच्यावर टीका करत निदर्शन करायची तयारी दाखवली. किरीट सोमय्यांच्या दौऱ्यामुळे दापोलीच्या पर्यटनावर परिणाम होईल असं म्हणत राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी सोमय्यांना दापोलीत रोखून धरु असं आव्हान दिलं.
हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा – अनिल परबांचं किरीट सोमय्यांना आव्हान
३) कशेळी घाटात पोलिसांनी सोमय्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला –
किरीट सोमय्यांच्या दौऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य तणावाच्या परिस्थितीचा आढावा घेत पोलिसांनी त्यांना दापोलीत येण्यापासून मनाई केली. किरीट सोमय्या आपल्या कार्यकर्त्यांसह खेडमध्ये दाखल होताच त्यांना पोलिसांनी लेखी नोटीस बजावत परिस्थिती बिघडेल असं सांगत रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दापोलीत कलम १४४ लागू केलं. यावेळी सोमय्या आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष झालेला पहायला मिळाला. परंतू दापोलीत जाणार असा ठाम निर्धार केलेल्या सोमय्यांनी पुढचा प्रवास सुरु ठेवला.
सोमय्यांना हातोडा घेऊ द्या, फावडं घेऊ द्या; आम्ही दिल्लीच्या तख्तासमोर नमणार नाही – विनायक राऊत
४) कार्यकर्त्यांसह किरीट सोमय्या आणि निलेश राणे दापोलीत दाखल –
एकीकडे दापोलीत तणावाचं वातावरण तयार होत असताना पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमय्यांविरुद्ध घोषणाबाजी केली ज्याला भाजप कार्यकर्त्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सोमय्या आणि निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली.
५) रिसॉर्टवर जाण्यापासून पोलिसांनी सोमय्या-निलेश राणेंना रोखलं –
पोलिसांनी किरीट सोमय्यांना रिसॉर्टवर जाण्यापासून रोखलं, ज्यामुळे दापोलीतल वातावरण आणखीनच चिघळायला सुरुवात झाली. सोमय्या आणि निलेश राणे यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. यावेळी सोमय्यांनी अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टबद्दल तक्रार नोंदवण्याची मागणी केली.
परंतू पोलीस आपली तक्रार नोंदवून घेत नसल्याचा आरोप सोमय्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. गनिमी काव्याने आपल्यावर हल्ला करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितल्याचं सोमय्या म्हणाले.
६) दिवस संपायला आला तरीही संघर्ष कायम –
एकीकडे किरीट सोमय्या अनिल परबांविरुद्ध FIR दाखल करुन घेण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यावर ठाम राहिले होते. मध्यंतरी भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांसह रिसॉर्टकडे जाण्याचा प्रयत्नही केला. परंतू पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक गर्ग हे दबावाखाली काम करत असून इथली कायदा-सुव्यवस्था बिघडावी अशी त्यांची इच्छा असल्याचा घणाघाती आरोप निलेश राणेंनी केला.
अखेरीस रात्री १० वाजल्यानंतर पोलिसांनी सोमय्या आणि राणे यांना अटक करुन जिल्ह्याबाहेर सोडण्याचा निर्णय घेतला. खुद्द सोमय्यांनी पत्रकारांशी बोलताना याबद्दलची माहिती दिली. अनिल परबांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी मुंबई ते दापोली दौरा केलेल्या सोमय्यांना यश आलं नाही, परंतू दिवसभरात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना आव्हान देण्याचं काम सोमय्यांनी निलेश राणेंच्या सोबतीने करुन दाखवलं. त्यामुळे या घटनेचे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कसे पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT