बीड : उसतोड मुकादमाचं शीर धडापासून वेगळं करत हत्या, नदीपात्रात फेकलं धड, ३ आरोपी अटकेत
बीड जिल्ह्यातील लव्हुरी येथील एका हॉटेलमधून उसतोड मुकादमाचं अपहरण करण्यात आलं होतं. या मुकादमाच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी त्याच्या मुलाजवळ १२ लाखांची खंडणी मागितली होती. अखेरीस या मुकादमाचं शीर धडापासून वेगळं करत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. सुधाकर चाळक असं या मुकादमाचं नाव असून त्याचं धड आरोपींनी हिरण्यकेशी नदीत फेकलं. यानंतर पुढे जाऊन १० किलोमीटर अंतरावर […]
ADVERTISEMENT

बीड जिल्ह्यातील लव्हुरी येथील एका हॉटेलमधून उसतोड मुकादमाचं अपहरण करण्यात आलं होतं. या मुकादमाच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी त्याच्या मुलाजवळ १२ लाखांची खंडणी मागितली होती. अखेरीस या मुकादमाचं शीर धडापासून वेगळं करत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. सुधाकर चाळक असं या मुकादमाचं नाव असून त्याचं धड आरोपींनी हिरण्यकेशी नदीत फेकलं.
यानंतर पुढे जाऊन १० किलोमीटर अंतरावर आरोपींनी चाळक यांच्या शीराची विल्हेवाट लावल्याचं समोर येतंय. केज पोलिसांचं पथक या घटनेचा तपास करत आहे.
सुधाकर उर्फ सुदाम चाळक हे महालक्ष्मी साखर कारखान्यात मजुर पुरवठा अधिकारी म्हणून कामाला होते. १६ फेब्रुवारीला त्यांचं काही अज्ञातांनी अपहरण केलं होतं. चाळक यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यावेळी २७ फेब्रुवारीला चाळक यांच्या मुलांना फोन करत अपहरणकर्त्यांनी १२ लाखांच्या खंडणीची मागणी केली. खंडणीसाठी धमकी देतानाची एक ऑडीओ क्लिप मध्यंतरी व्हायरल झाली होती ज्यात अपहरणकर्ते चाळक यांना मारहाण करताना ऐकायला येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे अपहरणकर्ते हिंदी भाषेत बोलत असून पैसे आणले नाहीतर तर चाळक यांना जीवे मारु अशी धमकीही त्यांनी मुलाला दिली.
बीडमध्ये अवैध धंद्यांना संदीप क्षीरसागर यांचं संरक्षण, शिवसेनेचा राष्ट्रवादीवर निशाणा










