शरद पवार ते संजय राऊत, सगळेच म्हणाले राज ठाकरेंचं भाषण म्हणजे…..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तर सभा चांगलीच गाजली. या सभेत भाषण करत असताना राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या भाषणानंतर झालेल्या सगळ्या आरोपांना उत्तर देत चौफेर टोलेबाजी केली. त्यांच्या भाषणाचे पडसाद राज्यात दिवसभर उमटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की “ही सभा म्हणजे पोरकटपणा होती. लोकांचं मनोरंजन होतं. ते भाषण करतात, नकला करून दाखवतात म्हणून गर्दी होते. ती सभा गांभीर्याने घेण्याची गरज नाही. “

हे वाचलं का?

राज ठाकरेंनी ज्यांचा उल्लेख भाषणात जंत पाटील असा केला होता त्या जयंत पाटील यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. जयंत पाटील म्हणाले, ”उत्तरसभेला उत्तर देण्यासारखं काहीही नव्हतं. लोकांनाही थोडं मनोरंजन मधून मधून हवं असतं म्हणून गर्दी झाली होती. अशा सभांकडे मनोरंजन म्हणूनच लोक बघतात. माझीही करमणूक झाली त्यांचं भाषण ऐकून.”

ADVERTISEMENT

देशाच्या चित्रपट सृष्टीला जे जॉनी लिवर देऊ शकला ते कोणीच नंतर देऊ शकलं नाही. महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर एक नवीन जॉनी लिवर जन्माला आला आहे. या नवीन जॉनी लिवरला खूप खूप शुभेच्छा!

जितेंद्र आव्हाड

ADVERTISEMENT

दिवा विझताना मोठा होतो! हे आज पुन्हा दिसले!

जय महाराष्ट्र!!

संजय राऊत, खासदार शिवसेना

राज ठाकरेंचा अभ्यास कमी आहे म्हणून त्यांना दुसऱ्याची ‘उत्तर’पत्रिका कॉपी करावी लागतेय.

यशोमती ठाकूर, काँग्रेस

राज ठाकरेंनी धमकी देता कामा नये. मंदिरात लाऊडस्पिकर लावा पण मशिदीवरचे भोंगे काढा ही त्यांची मागणी क्रूर आहे. भगवा रंग शांततेचे प्रतीक आहे त्याचा गैरवापर करू नका.

रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

राज ठाकरेंच्या भाषणाला फार महत्व देण्याची गरज नाही. योग्य वेळी उत्तर देईन त्याबद्दल काळजी नको. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे.

अजित पवार, उपमुख्यमंत्री

सध्या राज ठाकरे भाजपची सुपारी घेऊन मैदानात उतरले आहेत. भोंगे फक्त मुंबई आणि महाराष्ट्रात नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगा संपूर्ण देशातले भोंगे उतरवा.

विनायक राऊत, खासदार, शिवसेना

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT